Soumya Jakkal : ऑनलाइन ग्राहक जोडणारे सौम्या जक्कल यांचे हेड ॲण्ड टेल्स

सौम्या या अनेक वर्षे ह्यूमन रिसोर्स क्षेत्रात काम करत आहेत.
Soumya Jakkal
Soumya Jakkal esakal
Updated on

सोलापूर ः छोट्या उद्योगांना ऑनलाइन ग्राहक जोडून देण्यासाठी इ-कॉमर्स आणि सोशल मीडियासह सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्योगातील येथील सौम्या जक्कल यांनी हेड ॲण्ड टेल्स कंपनीच्या माध्यमातून १० जणांना रोजगार मिळवून दिला आहे.

Soumya Jakkal
Nashik News : मालेगाव तालुक्यातील 14 गावे टँकरमुक्त! 36 गावे, 83 वाड्यांना टॅंकर सुरूच

सौम्या या अनेक वर्षे ह्यूमन रिसोर्स क्षेत्रात काम करत आहेत. अनेक उद्योगात काम करत असताना आपण नोकरीसाठी जेवढे योगदान देतो, तेवढे योगदान स्वतःच्या उद्योगासाठी दिले तर निश्चित चांगली कामगिरी होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आले. त्या सुरवातीपासून नियमित कामासोबत ब्लॉग रायटिंग, कंटेंट रायटिंग ॲड स्लोगन तयार करणे, आर्टिकल लेखनात काम करत होत्या. त्यामुळे त्यांनी या क्षेत्राची निवड केली.

Soumya Jakkal
Nashik Crime News : अवैध हातभट्टी, मद्याचे अड्डे रडारवर! नाशिक ग्रामीण पोलिसांकडून छाप्यानंतर 6 गुन्‍हे दाखल

त्यांनी ऑनलाइन माध्यमाचा उपयोग छोट्या उद्योजक, व्यावसायिकांना करून देण्यासाठी काम सुरू केले. छोट्या उद्योजक, घरगुती व्यवसाय यांना फक्त दारावर ग्राहक आला तरच माल विक्री करता येतो या संकल्पनेतून त्यांना बाहेर काढण्याचे ठरवले. त्यांच्या उत्पादनांना इ कॉमर्स, सोशल मीडिया, ऑनलाइन वरून ग्राहक मिळवता येतो तसेच उत्पादनांची मागणी वाढवता येते यासाठी त्यांनी हे काम सुरू केले. तसेच छोट्या उद्योगांना त्याची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन त्या काम करतात.

Soumya Jakkal
Nashik News : मालेगाव तालुक्यातील 14 गावे टँकरमुक्त! 36 गावे, 83 वाड्यांना टॅंकर सुरूच

त्यांनी ऑनलाइन पद्धतीने हे काम करण्याचे ठरविले. सुरवातीला पुणे व सोलापुरातून त्यांनी कामास सुरवात केली. आता हा कामाचा परीघ मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, लंडन, युरोप, दुबई, सिंगापूर व आशियाई देशांमध्ये वाढवला आहे. सुरवातीला त्यांच्यासोबत तीन कर्मचारी होते आता १० जण काम करतात. सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होतात.

Soumya Jakkal
Dhule News : उपाशी मरण्यापेक्षा बंदुकीची गोळी खाऊन मरू! शेतकऱ्यांची भूमिका

- सुरवातीला एचआर क्षेत्रात काम

- मुक्त लेखनाची आवड जपत व्यवसायाचा विस्तार

- ग्राहकाला सर्व इ कॉमर्स सेवा

- सोशल मीडिया, फेसबुक, वेबसाइट डिझाईन, यूट्यब अपलोडसाच समावेश

- दुकानधारकापासून रुग्णालयापर्यंत सर्व ग्राहकांचा समावेश

- एकूण १० जणांना ऑनलाइन रोजगार

Soumya Jakkal
Nashik Crime News : 5 वर्षांपासून वीज चोरी! 8 लाखांची फसवणूक

स्टार्टअपमधून विकसित केलेली मूल्ये

- अन्य ठिकाणी नोकरीत केलेले श्रम स्वतःच्या व्यवसायासाठी केले प्रगती

- आवडीच्या कामातून उत्तम व्यवसायाची निर्मिती

- ग्राहकांची आर्थिक स्थिती पाहून सेवांचे कस्टमायझेशन

- वेळेत काम करण्याची शिस्त व ग्राहक सेवा यातून ग्राहकांचा विश्वास संपादन केले

-सुरवातीला गरजे पुरत्या दिलेल्या सेवेच्या समाधानातून नियमित ग्राहकांची निर्मिती

ज्या क्षेत्रात रस आहे त्यालाच आपल्या व्यवसायाचे केंद्रबिंदू केले. लेखनाची आवड जपत असताना व्यवसायाची उभारणी करता आली. स्वतःच्या व्यवसायासाठी चांगले परीश्रम घेतले तर आपण नोकरीपेक्षा अधिक कमावू शकतो हा आत्मविश्वास यातून मिळाला.

- सौम्या जक्कल, संचालिका, हेड ॲण्ड टेल्स कंपनी, सातरस्ता, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.