गणेश कांबळे
Java Plum Benefits - उन्हाळा व पावसाळ्याच्या ऋतूंमध्ये जांभळाचे झाड फळांनी लखडले जाते. याच जांभळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
त्याची चव गोड, तुरट असते. आयुर्वेदानुसार, जांभळाध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जांभूळ हे मधुमेह नियंत्रणासाठी खूप महत्वाचे कार्य करते.
त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी जांभूळ फळाचा उपयोग केला जातो. त्यामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात.
जांभूळ हे फक्त फळच नाही तर त्याच्या झाडाची साल, पाने आणि बियाही खूप उपयुक्त आहेत. लहान मुलांच्या आरोग्यासाठी जांभूळ खूप फायदेशीर असते.
आयुर्वेदाचार्य विवेकानंद पाटील सांगतात, जांभूळ हा चरका चार्यानुसार मूत्रसंग्रहणीय गणात आलेला आहे.
त्यामुळे ज्या आजारात मूत्राचे प्रमाण वाढते विशेष:ता प्रमेहामध्ये जांभूळ मूत्राचे शोषण करून मूत्रप्रवृत्ती कमी करतो. परंतु सरसकट सर्वच प्रमेहामध्ये जांभूळ वापरणे चुकीचे आहे, कफ व पित्तज प्रमेहामध्ये जांभूळ उत्तम गुणकारी असते.
जांभळाचे फळ, बी, साल, पाने आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जातात. इतर फळांच्या तुलनेत जांभूळ हे उत्तम फळ असल्याने त्याचे सेवन केल्यास शारीरिक आरोग्य उत्तम राहते.
जांभूळ खाण्याचे हे आहेत फायदे (Java Plum Health Benefits)
विंचू चावल्यास जांभळाच्या पानांचा रस लावल्याने सूज कमी होते.
जांभूळ हे फळ पित्तशामक आहे.
जांभूळ हे लोहयुक्त असल्याने ते खाल्यास रक्त शुध्द होते.
गर्भावस्थेत खूप जांभळे खावी किंवा त्याचे शरबत प्यावे.
बाळाच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे.
रक्त शुद्ध करते
जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळाच्या बिया उगाळून लेप केल्याने कमी होतात. जांभूळ हे पाचक आहे. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली,
सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास आवश्यक ते पोटॅशियम जांभूळ फळाच्या सेवनाने मिळते.
रक्तदाब राहतो नियंत्रणात
जांभूळ या फळाचे सेवन केल्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास होत असेल तर अशा लोकांनी जांभूळ फळाचे सेवन करणे, त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते
जांभूळ या फळाचे सेवन केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय संसर्गजन्य रोग देखील लवकर बरे होण्यास मदत होते.
सौंदर्यप्रसाधनासाठी उपयुक्त
जांभूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते. जांभळाचे फळ दीपक, पाचक व यकृतोत्तेजक आहे. घरगुती औषधात जांभूळ बी गळवांच्या त्रासावर उगाळून लावण्यास मदत होते.
तसेच जांभळाच्या सुक्या बियांतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांत रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्त्व सापडले आहे. सुगंधी पाने व गुणकारी बीज, फळे, फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांसाठी केला जातो.
डोळ्यांच्या समस्या होतात दूर (Java Plum benefits for eyes)
डोळ्यात जळजळ आणि वेदना होणे हे आजच्या काळातील वास्तव आहे. लहान मुले असोत की प्रौढ, प्रत्येकाला डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होताना दिसत आहेत.
त्यासाठी ४०० मिली पाण्यात जांभळाची १५-२० पाने शिजवून डेकोक्शन एक चतुर्थांश शिल्लक राहिला की, थंड करून डोळे धुतल्यास डोळ्यांच्या समस्या दूर हाेण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.