पंढरपूर : धनगर आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोपर्यंत आरक्षणाची मागणी सरकार पूर्ण करणार नाही, तोपर्यंत आमचे उपोषणाचे आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आज उपोषणाचा दहा दिवस आहे. पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानावर दहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे.