ऐन दुष्काळात ‘या’ ७ मंडळात अतिवृष्टी! मदतीचे निकष गावनिहाय सर्व्हेवर आवश्यक, अन्यथा शेतकऱ्यांना मिळणार नाही भरपाई

जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना बार्शी, माढा व मोहोळ तालुक्यातील काही मंडलात अतिवृष्टी झाली. काही गावात दुष्काळ तर काही ठिकाणी अचानक पाऊस अशी स्थिती आहे. काही गावे मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे मदतीचे निकष गावनिहाय सर्व्हेवर ठरविणे आवश्यक आहे.
sakal-exclusive
sakal-exclusivesakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असताना बार्शी, माढा व मोहोळ तालुक्यातील काही मंडलात अतिवृष्टी झाली आहे. दुष्काळसदृश परिस्थिती ठिबक सिंचनाद्वारे वाचविलेली पिके अतिपावसाने वाया गेली आहेत. जिल्ह्यात काही गावात दुष्काळ तर काही ठिकाणी अचानक पाऊस अशी स्थिती निर्माण झाल्याने काही गावे मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे मदतीचे निकष गावनिहाय सर्व्हेवर ठरविणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात कुठेही पाऊस नसताना मंगळवेढा-बोराळे या रस्त्यावर शनिवारी एका ठराविक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. या पावसाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायल झाला होता. हा एका ठराविक परिसरातीलच पाऊस होता. तर रविवारी मोहोळ तालुक्यातील शेटफळ, बार्शी तालुक्यातील खांडवी, माढा तालुक्यातील माढा, कुर्डुवाडी, म्हैसगाव व दारफळ (सीना) या मंडलात २४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तर दुसरीकडे उर्वरित जिल्ह्यातील पिके पावसाअभावी वाया गेली आहेत.

मदतीचे निकष बदलण्याची आवश्‍यकता

केवळ मंडलाच्या गावातील पावसाच्या आकडेवारीवरून मदतीचे निकष ठरविले जातात. यामुळे मंडलाच्या गावांपासून दूरवरील गावांवर अन्याय होत आहे. त्याऐवजी, प्रत्यक्ष गावातील तलाठी, कृषी सहायक व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांचा सर्व्हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उपस्थित, गावात पिकांतील अक्षांश-रेखांशसह छायाचित्रासह करणे आवश्यक आहे. बार्शी व खांडवी मंडलात सलग २१ दिवसांत एकाच दिवशी फक्त ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे २५ टक्के विम्याची अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला आहे. यामुळे पावसाची आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पिकांची स्थिती विचार घेणे, आवश्यक झाले आहे.

६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस

  • दारफळ (सीना) : १३० मिलिमीटर

  • शेटफळ : १०३ मिलिमीटर

  • माढा : ९१ मिलिमीटर

  • खांडवी : ८८ मिलिमीटर

  • म्हैसगाव : ८३ मिलिमीटर

  • कुर्डुवाडी : ६८ मिलिमीटर

  • टाकळी सिंकदर : ६५ मिलिमीटर

पर्जन्यमापक नसलेल्या गावांचे काय?

मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ हे मंडल नव्याने झालेले असून अद्याप या ठिकाणी पर्जन्यमापक नाही. या मंडलासाठी तालुक्याचा पाऊसच ग्राह्य धरला जातो. त्याऐवजी या गावाच्या मूळ मंडलातील पाऊस तरी ग्राह्य धरणे आवश्य आहे. अनेक गावे मंडलापासून पंधर किलोमीटरपेक्षा अधिक दूर आहेत. पावसाचे प्रमाण अतिशय विरळ व अनियमित असल्याने एकाच गावच्या एका बाजूला पाऊस तर दुसऱ्या बाजूला ऊन अशी स्थिती निर्माण होत आहे. यामुळे पर्जन्यमापक नसलेल्या गावांवर अन्याय होत आहे.

सोयाबीन, उडीद, मुगाचे नुकसान

पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल कृषी विज्ञाने केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांनी सांगितले की, आपल्या जिल्ह्यातील ड्रायस्पेल (पावसातील खंड) हा दोन ते सहा आठवड्यांचा असतो. यंदा जिल्ह्यात तीने ते चार आठवड्याचा खंड पडला आहे. यामुळे उडीद, मूग व सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. शेंगा येण्याच्या अवस्थेत पावसाने खंड दिल्याने फलधारणा झालेली नाही. जी पिके तीन महिन्यांनी परिपक्व होतात, ती पावसाअभावी अडीच महिन्यात परिपक्व झाली आहेत. यामुळे आता पाऊस जरी पडला तरी नुकसान टळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.