पालखी महामार्ग प्रकरणी मोरोचीतील ग्रामस्थांना उच्च न्यायालयाचा दिलासा

पालखी महामार्ग प्रकरणी मोरोची येथील ग्रामस्थांना उच्च न्यायालयाचा दिलासा
Court
CourtSakal
Updated on
Summary

ही सरकारी जागा आहे, असे भासवून अकलूज प्रांताधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांना विनामोबदला या जागेतून काढण्याचा प्रयत्न केला होता.

Summary

नातेपुते (सोलापूर) : आळंदी (Alandi) - पंढरपूर (Pandharpur) - मोहोळ (Mohol) या पालखी महामार्गावरील (Highway) (राष्ट्रीय राजमार्ग नं. 965) मोरोची गावठाण हद्दीतील जागेचे भूसंपादन करण्यात आले होते. परंतु, ही सरकारी जागा आहे, असे भासवून अकलूज (Akluj) प्रांताधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांना विनामोबदला या जागेतून काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मोरोची येथील अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करून या अधिकाऱ्यांचा डाव उधळून लावला आहे.

Court
काकांची हौस! पुण्याहून हेलिकॉप्टरने आणून लावले पुतणीचे लग्न

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर या पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी आवश्‍यक त्या ठिकठिकाणी जमीन भूसंपादन करून शासकीय नियमानुसार मोबदला दिला आहे. मोरोची (ता. माळशिरस) येथील रस्त्यालगतच्या भूसंपादनाचे आणि राहत्या घरांचे मूल्यांकन करून त्यांचा मोबदला देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, महसूल खात्यातील काही कर्मचाऱ्यांनी ही जागा शासकीय आहे, या जागेत अतिक्रमण आहे, असे सांगून मोबदला न देता रहिवाशांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला होता.

यासंदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या समोर जाऊन अनेकांनी कैफियत मांडली होती. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचे किंवा जनतेचे गाऱ्हाणे न ऐकता कब्जा करण्याचा प्रयत्न चालवला होता. 48 तासात जागा खाली करा, अन्यथा गुन्हे दाखल करू आणि जागेचा कब्जा घेऊ, अशा नोटिसाही काढल्या होत्या. परंतु, या 16 अन्यायग्रस्तांनी एकी करून ऍड. मिलिंद देशमुख यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करून न्यायाची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने ही रिट पिटीशन मंजूर करून तीन महिन्यांत योग्य तो मोबदला देण्यात यावा, असे आदेश अकलूज येथील प्रांतधिकारी यांना दिले आहेत.

Court
दृष्टिहीन मोनिकाचे नेत्रदीपक यश! बॅंकेत लिपिक पदापर्यंत मारली मजल

सरकार पक्षातर्फे ए. ए. पुरव यांनी काम पाहिले.

दरम्यान, येथे 16 कुटुंबांतील अनेकांचे छोटे-मोठे व्यवसाय आणि घरे आहेत. ही सर्व कुटुंबं बेघर होणार आहेत. या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बाधित लोकांना शासनाने लवकरात लवकर मोबदला द्यावा; जेणेकरून पालखी महामार्गाचे काम वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.