Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील आठ महामार्ग ठरतायेत ब्लॅक स्पॉट; 4 वर्षांत 421अपघात, 228 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ ठरतोय मृत्यूचा सापळा
road in solapur
road in solapuresakal
Updated on

- प्रमिला चोरगी

सोलापूर : शहर व जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्गावर चार वर्षांत ४२१ अपघात झाले असून त्यात २२८ जणांना जीवाला मुकावे लागले आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या आठ महामार्गावर ३६ अपघात प्रवण क्षेत्र आहे.

त्यात एकूण अपघातांपैकी ६५ टक्के अपघात हे शहर व जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वर झाले आहेत. महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून यामध्ये गंभीर दुखापत, मयतांची संख्येत वाढ होत आहे. या अपघातांमध्ये तुलनेने युवकांची संख्या अधिक आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे निकृष्ट काम, महामार्गालगत आवश्यक सुविधांचा अभाव आणि महामार्गाच्या निकषांचे संबंधित अधिकाऱ्यांकडून पालन न होणे. नियमबाह्य गतिरोधक, वाहनांच्या वेगावरील नियंत्रण नसणे,

वाहनाला ओव्हरटेक करणे अशी अपघाताचे मुख्य कारण आहेत. या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडून संयुक्तरित्या कार्यवाही होणे आवश्यक आहे.

रस्ता मस्त अन् जीव स्वस्त

शहर व जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. जिल्ह्याला व राज्याला जोडणाऱ्या गुळगुळीत सुंदर रस्त्यांवर वाहनांची वाढलेली गती ही अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

चांगल्या रस्त्यावर बेफाम सुटलेली वाहने, महामार्गावर चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा वेग अधिक असतो. तो आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रणात येत नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळते.

एकाच दिवसात देवदर्शनाची घाई

देवदर्शनासाठी निघालेल्या तीन कुटुंबावर काळाने घाला घातल्याच्या घटना चार महिन्यांत घडल्या आहेत.

एकाच दिवसात पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर असे देवदर्शन उरकून पुन्हा परतण्याची अनेकांना घाई असते. यामुळे झोप न घेता वाहन चालविण्याचे प्रकार होतात. चालकाला लागलेली एक डुलकी अपघाताला निमंत्रण देते.

अपघाताची कारणे

  • नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे आकलन नसणे

  • वेगवेगळ्या कंपन्यांच्या वाहनांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रखर प्रकाशाचे दिव्यांमुळे

  • डोळ्यांवर चमक येणे

  • अनावश्यक वाहनांची गती वाढविणे

  • महामार्गावरील ढाबे, हॉटेल या ठिकाणी लावण्यात आलेले लख्ख प्रकाशाचे

  • एलईदिवे त्यामुळे समोरील वाहन अस्पष्ट दिसतो

  • वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे आणि चॅटींग करणे

  • महामार्गावर चुकीच्या ठिकाणी वाहन थांबविणे

  • एकाच दिवशी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची घाई

road in solapur
Solapur News : काळविटाची शिंगे विकणाऱ्या तरुणास पकडले,पाच शिंगे हस्तगत; शहर गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

ग्रामीणमधील अपघाताचे हॉटस्पॉट

टेंभुर्णी येथील शिराह टे पाटीजवळ, वेणेगाव चौक, भीमनगर प्राची हॉटेल, करकंब येथील व्यवहारे पाटी, कोक नदी ते अजोटी पाटी, पंढरपूर शहरातील सरगम चौक ते अहिल्यापूल, मंद्रूपमधील टाकळी पूल ते कल्याणी पेट्रोलपंप.

शहरातील अपघाताचे हॉटस्पॉट

बाळे पूल, मार्केट यार्ड, केगाव ब्रीज, मडकी वस्ती, जुना पुना नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टॉप, डी मार्ट ते पर्ल गार्डन, सात रस्ता, पसारे वस्ती ते हिप्परगा ब्रीज, जुना तुळजापूर नाका.

आकडे बोलतात...

शहर परिसर

  • शहरातील ब्लॅक स्पॉट : १७

  • चार वर्षातील अपघात : २४०

  • अपघातातील मृत्यूची संख्या : ९९

ग्रामीण परिसर

  • ग्रामीण भागातील ब्लॅक स्पॉट : १९

  • चार वर्षातील अपघात : १८१

  • अपघातातील मृत्यूची संख्या : १२९

वाहनांचा अतिवेग, महामार्गाच्या बाजूला चुकीच्या ठिकाणी गाडी उभी करणे, युटर्नला ओव्हरटेक करणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे आदी अपघाताची कारणे आहेत. अपघातांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी ही प्रशासनासह नागरिकांचीदेखील आहे. प्रशासन आपल्या परिने उपाययोजना करीत असली तरी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

- अमरसिंह गवारे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी

शहराभोवती राष्ट्रीय महामार्गाचे जाळे वाढले आहेत. महापालिका, प्रादेशिक परिवहन काही प्रमाणात आपली जबाबदारी पार पाडतात. मात्र सुरक्षित वाहतुकीसाठी महामार्ग पोलिसांकडून कोणतीच ॲक्टिव्हिटी होताना दिसून येत नाही.

वेळोवेळी महामार्गाची देखभाल, दुरुस्ती झाली पाहिजे. वारंवार रस्त्याला थर्मलपेंट मारली पाहिजे. चांगल्या दर्जाच्या रस्त्यामुळे दुचाकी, तीनचाकी वाहन परवानगी नसताना महामार्गवर भरधाव धावतात. सर्व्हिस रोड नसल्याने ही वाहने मुख्य रस्त्यावर धावतात. यातूनच अपघाताचे प्रमाण वाढतात.

- सारंग तरे, सदस्य, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.