मोडकळीस आलेले होमगार्ड कार्यालयाचे 35 वर्षानंतर पालटले रुप

मोडकळीस आलेले होमगार्ड कार्यालयाचे 35 वर्षानंतर पालटले रुप
Updated on
Summary

होमगार्ड जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांचा पाठपुरावा व आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून मोडकळीस आलेले सोलापूरचे होमगार्ड प्रशिक्षण कार्यालय 35 वर्षानंतर स्मार्ट व हायटेक झाले.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केल्यास काहीही अशक्य नाही. याचे प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाची (home guard training office) रंगरंगोटी सजावट करुन आकर्षक व सर्व सोयीसुविधायुक्त उभे असलेले कार्यालय. होमगार्ड जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांचा पाठपुरावा व आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून मोडकळीस आलेले सोलापूरचे होमगार्ड प्रशिक्षण कार्यालय (home guard training office) 35 वर्षानंतर स्मार्ट व हायटेक झाले. (home guard training office in solapur become smart and high-tech after 35 years)

मोडकळीस आलेले होमगार्ड कार्यालयाचे 35 वर्षानंतर पालटले रुप
सोलापूर : 24 तासात कोरोनाचे 479 नवीन रुग्ण; तर सहा जणांना म्युकरमायकोसिस

सोलापूर शहरात विजापूर रोडवर जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाची इमारत असून, ती जुलै 1986 सालची आहे. साधारणत: 35 वर्षे जुनी आहे. सदर इमारतीचे छत हे कौलारुचे असल्याने, छताची मोठ्याप्रमाणात पडझड झाल्याने पावसाळ्यामध्ये त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असायची. तसेच सतत पाणी झिरपण्यामुळे स्टोअररुममधील जुनी अभिलेख, कोरे रजिस्टर व इतर साहित्य खराब होत असायचे. तसेच कार्यालयामध्ये एकच संगणक संच व एकच प्रिंटर उपलब्ध असल्याने कामात सतत अनेक अडथळा निर्माण होत असायचा.

मोडकळीस आलेले होमगार्ड कार्यालयाचे 35 वर्षानंतर पालटले रुप
उपळाई बुद्रुकच्या शिंदे बंधूंचे सातासमुद्रापार पाऊल 

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सतत कर्तव्य बजावत असणाऱ्या 'जिल्हा होमगार्ड' कार्यालयाची अशी झालेली पडछड व अवस्था पाहून जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांनी शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे व ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सहकार्यातून या कार्यालयाचे रुपडे बदलण्याचा निश्चय केला. व मोडकळीस आलेल्या इमारतींची माहिती त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना कळविली. त्यांनीही तातडीने सकारात्मक प्रतिसाद दर्शवत 4 संगणक संच व 4 प्रिंटर उपलब्ध करून दिले. तसेच इमारतीच्या रंगरंगोटीसाठी निधी उपलब्ध करून देत. पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईप लाईन, हायमास्ट दिवे अशा सर्व सोयी-सुविधांची उपलब्धता करुन दिली. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आली आहे.

मोडकळीस आलेले होमगार्ड कार्यालयाचे 35 वर्षानंतर पालटले रुप
उपळाई बुद्रूक येथून मुलाच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न 

नुकतेच या जिल्हा होमगार्ड कार्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, आमदार प्रणिती शिंदे, पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, दिपीका झेंडे, जिल्हा परिषद मुख्य लेखाधिकारी अजयसिंग पवार, प्रल्हाद काशीद आदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. पी. घाडगे, काजुळकर, काटे, विक्रांत मोरे, दळवे यांनी परिश्रम घेतले.

मोडकळीस आलेले होमगार्ड कार्यालयाचे 35 वर्षानंतर पालटले रुप
बेभरवशाची नोकरी सोडून उपळाई येथील तरुण कमावतोय गांडूळ खत निर्मितीतून महिन्याला लाखो रुपये ! 

होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त स्वत:हुन घेतात काळजी.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहर पोलिसांसोबत बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असणाऱ्या होमगार्ड यांना कोरोना कालावधीमध्ये कल्याणकारी बाबीमधून कोरोना पोझिटिव्ह होमगार्ड यांचे उपचाराकरिता सोलापूर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर व ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस कल्याण निधीतून वेळोवेळी मदत पुरविली आहे व वेळोवेळी कर्तव्यावरील होमगार्ड यांच्या अडचणी सोडविलेल्या आहेत. ज्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह होमगार्ड यांना व कर्तव्यावरील इतर होमगार्डना दिलासा मिळत आहे. त्यात जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या इमारतीचा कायापालाट झाल्याने होमगार्ड कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. (home guard training office in solapur become smart and high-tech after 35 years)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.