सोलापूर : शहरात घरबांधणीच्या व्यवसायात साहित्य महागले असले तरी गृहकर्जाचा निचांकी व्याजदर दिलासा देणारा ठरला आहे. पण घरबांधणीसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या २.६७ लाख रुपयांच्या अनुदान योजनेची मुदत मार्चनंतर वाढेल का? याकडे रिअल इस्टेट क्षेत्राचे लक्ष लागले आहे. क्रेडाईच्या वतीने नवीन प्रकल्प लाँच करण्याच्या योजना, तंत्रज्ञानाचा अवलंब, ऑनलाइन विक्रीचे योगदान, नवीन मालमत्तावर्ग, सरकारकडून अपेक्षा, तंत्रज्ञानाचा अवलंब अशा अनेक बाबींवर सक्रिय सहभाग दर्शवितो. याबाबत एक पाहणी करण्यात आली.
कोविड-१९ ची तिसरी लाट सुरू झाल्यामुळे, पुढील कोणत्याही परिणामांची तयारी आणि नियंत्रणासाठी सरकारने अतिरिक्त उपाय करावेत अशी आमची अपेक्षा आहे. यामध्ये ज्यात कच्च्या सामुग्रीचा खर्च नियंत्रित करणे, जीएसटीवर क्रेडिट माहिती, निधीची उपलब्धता वाढवणे, सुव्यवस्था करणे आणि प्रकल्पाची उत्साही भावना कायम ठेवण्यासाठी प्रकल्पांना त्वरित मंजुरी देण्याची गरज आहे. बहुतेक विकसक डिजिटल परिवर्तनावर लक्ष केंद्रित करत आहेत. ज्यामुळे ऑनलाइन विक्रीत किमान ५५ टक्के वाढ झाली आहे. तसेच विकसक व्हीआरसारख्या नवतंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. विशेष म्हणजे, ३९ टक्के विकासक हे सुमारे २५ टक्के ऑनलाइन विक्री करत आहेत, त्यामुळे नव्या वर्षात ऑनलाइन विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षात नेमके काय बदल होतील
७४ टक्के विकसकांच्या व्यवसायाचे सुलभीकरण वाढेल ५५ टक्के विकसक व्यवसायात आभासी अस्तित्वाचा अवलंब करतील ऑनलाइन विक्री ३९ टक्के विकसकांच्या व्यवसायात २५ टक्केपर्यंतच्या वाढीस योगदान देईल ६५ टक्के विकसक सहकारी, सहजीवनसारख्या नवीन व्यावसायिक मॉडेलचे अन्वेषण करण्यास इच्छुक ९६ टक्के विकासक निवासी स्थावर मालमत्ता लाँच करण्यास प्राधान्य देतील ४५ टक्के विकासक अनिवासी स्थावर मालमत्ता लाँच करण्यास प्राधान्य देतील बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्यामुळे किंमती २० टक्केंनी वाढण्याची शक्यता.
पुण्यात काम करणारे शेकडो तरूण व आयटी व्यवसायिक सोलापुरात परत आले आहेत. या रिव्हर्स मायग्रेशनमुळे घरांची मागणी वाढली आहे. तसेच वर्क फ्रॉम होममुळे वन बीएचके कडून टू बीएचके बदल केला जात आहे. या क्षेत्राची गती आता सोलापुरात आयटी पार्क सुरु होणे या मुद्द्यावर येऊन पोहोचली आहे. विकासाच्या सर्व मुद्द्यांशी घरबांधणीचे क्षेत्र जोडले गेले आहे.
- शशिकांत जिड्डीमनी, अध्यक्ष, क्रेडाई, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.