शासकीय महापूजेवेळी "यांनाच' मंदिरात प्रवेश !

शासकीय महापूजेवेळी "यांनाच' मंदिरात प्रवेश ! मानाच्या पालख्या आज दुपारी पंढरीत
Waari
Waaricanva
Updated on

सुरवातीला गाभाऱ्यात मंदिराचे पुजारी असतील. त्यावेळी मंदिरातील चारखांबीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांची उपस्थिती असेल.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्‍वभूमीवर यंदाची आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरूपात साजरी केली जाणार आहे. मानाच्या दहा पालख्यांसोबत प्रत्येकी 40 वारकऱ्यांना परवानगी दिली असून महापूजेसाठी मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी दाम्पत्य, मंदिर समितीचे सहअध्यक्ष, पालकमंत्री यांनाच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. पंढरीत संचारबंदी (Curfew) लागू झाली असून अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला आहे. (Honorable palanquins will arrive in Pandharpur on Monday afternoon-ssd73)

Waari
"एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

शासकीय महापूजेच्या दृष्टीने मंदिर समिती, जिल्हा व पोलिस प्रशासन, पंढरपूर नगरपरिषद, प्रांताधिकारी यांनी ठोस नियोजन केले आहे. सुरवातीला गाभाऱ्यात मंदिराचे पुजारी असतील. त्यावेळी मंदिरातील चारखांबीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांची उपस्थिती असेल. तर सोळखांबीत मंदिर समितीचे 14 सदस्य, सल्लागार समितीचे नऊ सदस्य, विभागीय आयुक्‍त, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व प्रांताधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान, या सर्वांची कोरोना चाचणी (Covid Test) करून रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. पंढरपुरातील इतर कोणालाही अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, यादृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त नियुक्‍त केला आहे.

श्री विठ्ठल मंदिराचा गाभारा, चारखांबी आणि सोळा खांबी या ठिकाणी मोजक्‍याच अधिकाऱ्यांना प्रवेश असणार आहे. शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री, त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांनाच प्रवेश असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागील बाजूस पालकमंत्री असतील.

- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर

Waari
परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा मिळणार संधी! सोलापूर विद्यापीठ

महापूजा अन्‌ वारीसंदर्भातील ठळक बाबी...

  • पंढरपूर व परिसरात संचारबंदी लागू; आज (सोमवारी) दुपारी तीनपर्यंत पंढरीत दाखल होणार मानाच्या पालख्या

  • वाखरीत पालख्या दाखल झाल्यानंतर विसाव्यापर्यंत वारकरी चालत जाणार

  • प्रत्येक पालखीसोबत 40 वारकरी असतील; पादुकासोबत दोघेच तर उर्वरित 38 जण पालखीसोबत बसमधून जाणार

  • पंढरीतील स्थानिक अंदाजित 100 वारकरी व फडकऱ्यांना वाखरीला न जाऊ देता नगरप्रक्षिणा करण्यास परवानगी

  • महापूजेसाठी मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी दाम्पत्य, पुरोहित, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गाभाऱ्यात असतील

  • चारखांबीतील महत्त्वाच्या व्यक्‍तींना पूजेसाठी गाभाऱ्यात मिळणार प्रवेश; सोळा खांबीतील व्यक्‍ती जागेवरच थांबणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.