लज्जतदार भाज्यात वापरले जाणारे पनीरचे आरोग्यदायी फायदे आहेत कसे ? जाणुन घ्या सविस्तर 

PANEER.jpg
PANEER.jpg
Updated on

सोलापूरः पाहुण्याची सरबराई असो कि मेजवाणी असली की पनीर मिसळून केलेली ग्रेव्हीच्या भाज्या हा पदार्थ आता अगदीच नित्याचा झाला आहे. दुधापासून बनलेल्या पनीरचे प्रथिनमुल्य अधिक असल्याने ते आरोग्यदायी म्हणून ओळखले जाते. दुधापासून बनत असल्याने अगदी सहज घरी बनवणे किंवा विकत मिळणे शक्‍य असते. आता घरात पनीर सोबत तयार केलेल्या भाज्या नेहमीचा मेनु बनला आहे. 

पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर अत्यंत पौष्टिक असतं. त्यामध्ये फॅट्‌स पण असतात. आपल्या आहारात पनीरचा योग्य पध्दतीने वापर कसा करावा हे माहिती असणं आवश्‍यक आहे. पनीरमुळे भरपूर प्रथिने मिळतात. पनीर खाणं सर्वांसाठी आरोग्यदायी असतं. 


ज्या लोकांच्या शरीरात युरिक ऑसिडचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यांना प्रोटीन न खाण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे त्यांनी डॉक्‍टराच्या सल्ल्याशिवाय खाऊ नये. जे नियमित व्यायाम करतात त्यांनी पनीर खाणं गरजेचे आहे. भरपूर प्रथिनामुळे वाढीच्या अवस्थेतील शाळकरी मुलापासून ते व्यायाम करणाऱ्या कॉलेजच्या मुलांना पनीर अगदीच उपयुक्त आहे. वाढीला पुरक असलेले प्रथिने त्यातून मिळतात. अंगमेहनत करणाऱ्या व्यक्तीसाठी देखील ते उपयुक्त आहे. 
मात्र हे पनीर कधी आणि किती प्रमाणात खायला हवं, हे जाणून घेणे गरजेचे आहे. पनीर एका दिवसात 200 ग्रॅमहून अधिक खाऊ नये. एका वेळेत 100 ग्रॅम पनीर पुरेसे असते. रात्री उशीरा पनीर खाऊ नये. पनीर नेहमी वेगवेगळ्या भाज्यासोबत मिक्‍स करून खावं. त्यातील प्रोटीनमुळे पोट खूप वेळेसाठी भरलेलं जाणवतं. ते शरीरात खूप चांगल्या पद्धतीनं पचवल जात. पनीर आणि हंगामी भाज्या बरोबर प्रमाणात खाव्यात, कारण पनीरमध्ये सोडियमचं प्रमाण खूप असते. भाज्यासोबत पनीरचे पचन अत्यंत सुलभ होते. भाज्यासोबत मिसळलेल्या पनीर पचनामध्ये हाय फायबर डाएटमध्ये रूपांतरीत होतं. 

पनीर चा वापर उपयुक्त 
पनीर खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते. 
हेल्दी फूडमध्ये पनीरचा समावेश होतो. 
पनीरमध्ये प्रोटिन्स असतात.त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते 
पनीर ह्रदयरोग रोग, मधुमेह किंवा काही त्रास असतील त्यांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने खावे. 

पनीर हे प्रोटिन फूड 
पनीर हा प्रथिनांचा उपयुक्त उत्कृष्ट स्त्रोत आहे. आरोग्यदायी असलेले पनीर वाढीच्या वयातील मुलासाठी उपयुक्त आहे. खेळ व व्यायाम नियमित करणाऱ्या व्यक्तींना पनीर अधिक गरजेचे असते. शरिरामध्ये पेशीची वाढ होण्यासाठी लागणारी प्रोटिनची गरज भागवण्याचे पनीरमुळे होते. अंगमेहनत करणाऱ्या लोकांना आहारात ते उपयोगी आहे. दूधाचा उपपदार्थ असल्याने भारतीय आहार पध्दतीला मानवणारा हा पदार्थ आहे. 
- श्रध्दा पडसलगीकर, आहार तज्ञ सोलापूर. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.