Sushilkumar Shinde : सोलापूरच्या राखीव मतदारसंघातून देशमुख उमेदवार कसे? सुशीलकुमार शिंदेंचा सवाल

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंचा सवाल; ॲड. आंबेडकर महाविकास आघाडीसोबत
How did Deshmukh become candidate from Solapur reserved constituency Sushilkumar Shinde
How did Deshmukh become candidate from Solapur reserved constituency Sushilkumar ShindeSakal
Updated on

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लिंगायत समाजाचे नेते आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव समोर येत असल्याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना विचारले.

त्यावेळी हा लोकसभा मतदारसंघ राखीव आहे ना, मग आमदार विजयकुमार देशमुख हे उमेदवार कसे होतील? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. देशमुखांकडे अनुसूचित जातीचा दाखला असल्याची चर्चा आहे, असे पत्रकारांनी म्हणताच भाजप काहीही करू शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

सोमवारी (ता. ११) माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. शिंदे यांनी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी संग्राम थोपटे यांच्याशी जुळवून घेतले आहे.

सोलापुरातील थोपटे कोण आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावेळी श्री. शिंदे म्हणाले, सोलापुरात कुणीही संग्राम थोपटे नाहीत, सर्व आमचेच आहेत. मी कायम त्यांना भेटत असतो. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर आमचे सहकारी म्हणून महाविकास आघाडीमध्ये येत आहेत.

त्यामुळे त्यांना दुखवता कामा नये, पूर्वी ते माझ्या विरोधात उभे राहिले होते. त्यापूर्वी ते माझ्यासोबत खासदार म्हणून संसदेत होते. मी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक असल्याने त्यांच्याबाबत दपकून बोलण्याचे काहीही कारण नाही. संधी मिळाली तर त्यांना दिलीच पाहिजे, असेही श्री. शिंदे यांनी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.