बारावी निकाल : सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा तर पुणे विभागात पहिला

बारावी निकाल : सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा तर पुणे विभागात पहिला
बारावी निकाल : सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा तर पुणे विभागात पहिला
बारावी निकाल : सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा तर पुणे विभागात पहिलाEsakal
Updated on
Summary

पुणे बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला असून पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक आहे.

सोलापूर : पुणे बोर्डाचा (Pune Board) बारावी परीक्षेचा निकाल (Result of 12th examination) आज जाहीर झाला असून पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा (Solapur District) निकाल सर्वाधिक आहे. पुणे विभागात (Pune Division) सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी अव्वल ठरले. 50 हजार 397 विद्यार्थ्यांपैकी 97 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल 99.80 टक्‍के लागला आहे. कोरोनामुळे (Covid-19) यंदा बारावीची परीक्षा झालीच नाही. दहावी, अकरावीच्या गुणांसह अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरून निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावी परीक्षेत पुणे जिल्ह्याचा निकाल 99.72 टक्‍के तर नगर जिल्ह्याचा निकाल 99.78 टक्‍के लागला आहे. परीक्षा न झाल्याने दहावीप्रमाणेच बारावीच्या निकालाची टक्‍केवारी वाढणार हे निश्‍चित होते. त्यानुसार जिल्ह्यातील काही विद्यार्थी 100 टक्‍के गुण मिळवून राज्यात अव्वल ठरले आहेत. राज्यातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) व रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांचा निकाल 99.81 टक्‍के इतका आहे. तर सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.80 टक्‍के आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रथमच घवघवीत यश मिळवत राज्यात नावलौकिक मिळवला आहे.

बारावी निकाल : सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा तर पुणे विभागात पहिला
अडीच कोटींहून जास्त विद्यार्थ्यांकडे नाहीत डिजिटल उपकरणे !

पुणे विभागात प्रथमच सोलापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. पालकांचे प्रयत्न अन्‌ विद्यार्थ्यांची जिद्द आणि शिक्षकांचे परिश्रम, यातून हे यश मिळाले आहे. राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा निकाल तिसऱ्या क्रमांवर आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी (99.81 टक्‍के) या जिल्ह्यांनंतर सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.80 टक्‍के लागला आहे.

- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

बारावी निकाल : सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा तर पुणे विभागात पहिला
भारतीय सैन्यात अधिकारी पदांची भरती ! पगार दोन लाखांपर्यंत

निकालासंदर्भातील ठळक बाबी...

  • राज्यात तिसरा तर पुणे विभागात सोलापूर जिल्हा बारावी निकालात अव्वल

  • सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.80 टक्‍के; 50 हजार 397 पैकी 50 हजार 300 विद्यार्थी उत्तीर्ण

  • 27 हजार 845 विद्यार्थी डिस्टिंक्‍शनमधून उत्तीर्ण 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण

  • 60 पेक्षा अधिक गुण घेऊन 19 हजार 785 विद्यार्थी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण

  • दोन हजार 629 विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण तर 35 ते 44 टक्‍केवारी घेऊन 41 विद्यार्थी पास

शाखानिहाय निकाल

विज्ञान शाखा :

  • 13,109 मुले आणि 10,241 मुलींनी दिली होती परीक्षा

  • 13,062 मुले तर 10 हजार 219 मुली झाल्या परीक्षा उत्तीर्ण

  • एकूण 23,281 विद्यार्थी उत्तीर्ण (99.70 टक्‍के)

कला शाखा :

  • 10,396 मुलांनी तर 6825 मुलींनी दिली होती बारावीची परीक्षा

  • 17,221 विद्यार्थ्यांपैकी 10 हजार 390 मुले आणि सहा हजार 821 मुली झाल्या उत्तीर्ण

  • एकूण 17,211 विद्यार्थी उत्तीर्ण (99.94 टक्‍के)

वाणिज्य शाखा :

  • 3983 मुले आणि 3948 मुलींनी दिली बारावीची परीक्षा

  • 7931 एकूण विद्यार्थ्यांपैकी 3982 मुले तर 3946 मुली उत्तीर्ण

  • 7,928 विद्यार्थी उत्तीर्ण (99.96 टक्‍के)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()