चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरीच केला अभ्यास! दुसऱ्याच प्रयत्नात ‘युपीएससी’त पास

कोणतीही शिकवणी न लावता घरी बसून अभ्यास करूनही यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे शिखर गाठता येते, हे सोलापुरातील अनय नितीन नावंदर याने दाखवून दिले आहे.
ANAY NAVANDAR
ANAY NAVANDARESAKAL
Updated on

सोलापूर : कोणतीही शिकवणी न लावता घरी बसून अभ्यास करूनही यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे शिखर गाठता येते, हे सोलापुरातील अनय नितीन नावंदर याने दाखवून दिले आहे. आज जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालामध्ये अनय याने देशात ३२ वा क्रमांक मिळविला आहे.

ANAY NAVANDAR
महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

वडील चार्टर्ड अकांउटंट व आई न्यायाधीश असल्याने अनयला सातत्याने शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालये बदलावी लागली. तरीदेखील, अभ्यास, जिद्द, चिकाटीतून त्याने हे यश संपादित केले. कौटुंबिक परिस्थिती चांगली असल्याने अनेकजण युपीएससी, एमपीएससी करताना मुंबई, पुणे, दिल्ली येथे ट्यूशन लावतात. त्यासाठी लाखो रुपये खर्च होतो. पण, अनयने मुंबईतील आयसीटी कॉलेजमधून केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर पहिले सहा महिने खासगी कंपनीत नोकरीदेखील केली. खासगी कंपनीत नोकरी करण्यापेक्षा प्रशासकीय सेवेतून लोकसेवा करण्याच्या हेतूने अनयने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत गेल्यानंतरही अनयला अपयश आले होते. पण, अपयश ही यशाची पहिली पायरी समजून त्याने पुन्हा जोमाने अभ्यास सुरु ठेवला. दुसऱ्याच प्रयत्नात अनयला यश मिळाले आणि तो देशात ३२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचे वडील नितीन नांवदर हे नामवंत चार्टर्ड अकांउटंट असून अनयची आई पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत. अनयचे कुटुंबिय सध्या पुण्यात स्थायिक आहेत. मूळचे सोलापूरचे असलेले नाविंदर यांना प्रशासकीय बदल्यांमुळे इतरत्र प्रवास करावा लागला. पण, अनयने अभ्यासातील सातत्य कायम टिकवून ठेवले आणि स्वप्नातील यश गाठले.

ANAY NAVANDAR
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जूनअखेर मिळणार १० हजार कोटींचे प्रोत्साहन अनुदान

दुसऱ्या प्रयत्नात मिळविले यश

युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनयचे पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण सोलापुरातील सेंट जोसेफ प्रशालेत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण माजलगाव येथे झाले. पुन्हा ११ वी आणि बारावीचे शिक्षण त्याने सोलापुरातील ए. डी. जोशी महाविद्यालयातून पूर्ण केले. पुण्यात घरी बसून त्याने युपीएससीचा अभ्यास केला आणि अखेर तो दुसऱ्याच प्रयत्नात देशात ३२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()