Solapur News : मी मोहोळ विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवणार, विकासाच्या राजकारणासाठी साथ द्या - रमेश कदम

माजी आमदार कदम यांना एक महिन्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला,
I will re-contest Mohol assembly elections Ramesh Kadam solapur politics
I will re-contest Mohol assembly elections Ramesh Kadam solapur politicsSakal
Updated on

मोहोळ : मला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोन आले, आमच्याकडे या मात्र ज्या जनतेने मी कारागृहात असतानाही मला 25 हजार मते दिली त्यांच्याशी विचार विनिमय करूनच मी राजकीय निर्णय घेणार. मी मोहोळ विधानसभेची निवडणूक लढविणार असुन विधानसभा मतदारसंघात नवीन विकासाचे राजकारण करू. परत आलो! परत लढणार!

ही स्लोगन घेऊन मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास माझे प्राधान्य राहील, अफवावर विश्वास ठेवू नका असे प्रतिपादन मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी केले. माजी आमदार कदम यांना एक महिन्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, त्यानंतर नागरिकांच्या भेटीसाठी ते तब्बल आठ वर्षानंतर प्रथमच मोहोळ विधानसभा मतदारसंघात आले त्यावेळी त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

माजी आमदार कदम यांचे शहरात आगमन होताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातील ग्रामदैवत नागनाथ महाराजासह अन्य देवतांचे दर्शन घेतले. माजी आमदार कदम म्हणाले, मतदार संघात सध्या पाण्याची अडचण आहे याची मला जाण आहे, त्यासाठी मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता हा उपक्रम पुन्हा सुरू करणार आहे.

I will re-contest Mohol assembly elections Ramesh Kadam solapur politics
Solapur News : म्हैसाळच्या पाण्यासाठी गावागावात भांडण;पाण्याचे आवर्तन घेण्यासाठी मारामारी

मोहोळ विधानसभा मतदारसंघात पंढरपूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील गावे आहेत त्या गावात पुन्हा पहिल्यासारखे काम करू. मोहोळ मध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत परंतु विकासासाठी त्यांना बरोबर घेऊन काम करू.

  • मोहोळ येथील शिवाजी चौकात लावलेल्या डिजिटल फरकावर राष्ट्रवादीचे खा शरद पवार, माजी आमदार रमेश कदम, व रमेश बारसकर यांचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत होते

  • उड्डाण पुलावर प्रचंड गर्दी होती

  • माजी आमदार कदम यांचे शहरात आगमन होताच उड्डाण पुलावरून अनेकांनी त्यांच्यावर पोत्याने पुष्पवृष्टी केली

  • मागील गोंधळाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त, अश्रू धूर व बंदूकधारी पोलीस तैनात केले होते

  • नगर परिषदेच्या टॉवर वरून ही पोलिसांची निगराणी सुरू होती

  • पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते

  • कार्यक्रमा वेळी पावसाचे आगमन

  • कार्यकर्त्यांच्या अंतर्गत संपर्कासाठी वीस वॉकीटॉकी संच त्यांना दिले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.