- बलभीम लोखंडे
वैराग - इंजिनिअरिंग पास झाल्यावर आयएएस अधिकारी व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिल्यावर पुण्यात खासगी कंपनीत नोकरी केली. व्यवसायाची आवड असल्याने मुंबईला अनेक प्रशिक्षणे घेतली. मात्र, कोरोनामुळे पुण्यातील घडी विस्कटल्याने गाव गाठलं, त्यानंतर स्वप्नातील व्यवसायाला मूर्त रूप देत जवळगावच्या (ता. बार्शी) अभियंता प्रताप ढेंगळे याने ड्रॅगन फ्रूट लागवडीच्या प्रयोगातून वर्षाला सोळा लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळविले आहे. ग्रामीण भागात वेगळ्या प्रयोगातून चांगले उत्पन्न मिळवीत तरुणाने शेतकऱ्यांसमोर चांगले उदाहरण निर्माण केले आहे.