आगामी महापौर राष्ट्रवादीचाच! कोठेंमुळे आत्मविश्वास वाढला

Mahesh Kothe
Mahesh Kothe
Updated on
Summary

महेश कोठेंना पक्षात घ्या, शहरात राष्ट्रवादी बळकट होईल, असा विश्‍वास त्याच नेत्यांनी व्यक्‍त केल्याचे बैठकीला उपस्थित एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

सोलापूर : कॉंग्रेसमधून शिवसेना आणि आता शिवसेनेतून राष्ट्रवादीत येण्यास इच्छूक असलेल्या महेश कोठेंना पक्षात घेतल्यास शहरातील ताकद वाढेल, असा विश्‍वास जिल्हाध्यक्ष बळीराम साठेंसह स्थानिक आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्‍त केला. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या कोठेंना पक्षातील काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. हा विरोधाचा सूर पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर पोहचला. त्यासंदर्भात पुण्यात बैठक पार पडली. त्यावेळी कोठेंना पक्षात घ्या, शहरात राष्ट्रवादी बळकट होईल, असा विश्‍वास त्याच नेत्यांनी व्यक्‍त केल्याचे बैठकीला उपस्थित एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. (if mahesh kothe is taken to the NCP the NCP will be strengthened in the city)

Mahesh Kothe
महेश कोठेंच्या प्रवेशावर आमदार संजय शिंदे का बसले गप्प? आता कोठेंनी धरला दुसरा मार्ग 

महापालिकेवरील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेला कोठेंच्या ताकदीने खिंडार पडले आणि भाजप-शिवसेनेची युती विजयी ठरली. मात्र, राज्यात युती तुटल्यानंतर महापालिकेत शिवसेना विरोधी बाकावर बसली. त्यानंतर ही ताकद पाहून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्‍वास कोठेंना होता. मात्र, पक्षाअंतर्गत कुरघोडीमुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. नाराज कोठेंनी पक्षाविरूध्द बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली. तरीही, शहरातील ताकद पाहून त्यांची बंडखोरी विसरून पक्षाने त्यांच्याकडेच महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविली. मात्र, पराभव जिव्हारी लागलेल्या कोठेंचे मन शिवसेनेत रमले नाही आणि त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याची मानसिक तयारी केली.

Mahesh Kothe
महेश कोठेंचा मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश?

मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊनही राज्यातील महाविकास आघाडी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे कोठेंचा प्रवेश लांबला. आता पुण्यातील बैठकीत कोठेंना तुमचा प्रवेश झाल्याचे समजून आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश शरद पवार यांनी दिल्याचे त्यांनी स्वत: 'सकाळ'शी बोलताना सांगितले. दरम्यान, महापालिकेचे विद्यमान विरोधी पक्षनेते अमोल शिंदे म्हणाले, मी शिवसेनेतच राहणार आहे. त्यामुळे कोठेंसोबत कोणकोणते नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार, याची उत्सुकता आहे.

Mahesh Kothe
पुणे-सोलापूर मार्गाने प्रवास करताय? वाचा महत्त्वाची बातमी

विरोध करणारे कोठेंच्या नेतृत्वाखाली काम करणार का?

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे यांनी कोठेंच्या प्रवेशाला विरोध केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, महेश गादेकर यांच्यासह इतर नेतेमंडळींनी कोठेंना राष्ट्रवादीत घेतल्यास पक्ष बळकट होईल. पक्षाबरोबरच कोठेंच्या ताकदीवर महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर होईल, असा विश्‍वासही शरद पवार यांच्याकडे व्यक्‍त केल्याचे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, कोठेंच्या प्रवेशामुळे आपले पद धोक्‍यात येऊ शकते, अशी भिती असलेले आता कोठेंच्या नेतृत्वाखाली काम करतील का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, पुण्यातील बैठकीत महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी शहरात शंभरहून अधिकजणांची नेमणूक केल्याचे शहराध्यक्षांनी सांगितले. त्यावेळी दिलीप कोल्हे यांनी त्यावर हरकत घेत, ते सर्वजण कागदावर असल्याचे स्पष्ट केले. तसेच पदाधिकारी आम्हाला बैठकीलाही बोलवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यावेळी आम्ही निरोप देऊनही कोल्हे बैठकीला येत नसल्याचे शहराध्यक्षांनी सांगितल्याचीही चर्चा आहे.

Mahesh Kothe
सोलापूर विद्यापीठाची जुलै व ऑगस्टमधील परीक्षाही ऑनलाइनच !

चार सदस्यीय प्रभाग नकोच

मागील महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग केल्याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला. त्यासंदर्भात पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत एक तथा दोन सदस्यीय प्रभाग होईल, यादृष्टीने तुम्ही तयारी करा, असा सल्ला पक्षश्रेष्ठींनी दिल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले बंडखोरी करणार नाहीत, याकडेही लक्ष देण्याच्या सूचना पक्षातील वरिष्ठांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचेही बोलेले जात आहे. (if mahesh kothe is taken to the NCP the NCP will be strengthened in the city)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.