Water Issue : मांगी तलावातील पाण्याकडे दुर्लक्ष; नागरिकांना फेब्रुवारीतच पाण्यासाठी करावी लागणार भटकंती

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अपयशी ठरत असून उजनीच्या पाण्याप्रमाणेच मांगी तलावातील आरक्षित पंधरा टक्के पाणी बेसुमार उपशाने तलावात केवळ साडेचार टक्केच शिल्लक राहिले आहे.
Mangi Lake Water
Mangi Lake WaterSakal
Updated on

पोथरे, ता. करमाळा - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अपयशी ठरत असून उजनीच्या पाण्याप्रमाणेच मांगी तलावातील आरक्षित पंधरा टक्के पाणी बेसुमार उपशाने तलावात केवळ साडेचार टक्केच शिल्लक राहिले आहे.

याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर, फेब्रुवारीतच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांवर भटकंतीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने आरक्षित पाण्याचा उपसा थांबवला नाही तर नागरिकांबरोबरच येथील वन्य प्राण्यांचे मोठे हाल होणार आहेत.

मांगी (ता. करमाळा) तलाव हा ब्रिटिशकालीन तलाव असून, या पाण्यावर तालुक्यातील उत्तर भागातील नागरिकांचे जीवनमान अवलंबून आहे. तलावातील पाणी येथील शेतीसाठी व नागरिकांच्या पिण्यासाठी उपयोग होतो. तलावालगतच कामोने येथे अभयारण्य असल्याने येथील वन्यप्राणी हे या तलावावरच पाणी पिण्यासाठी येतात. तलावातील पंधरा टक्के पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे.

मात्र या आरक्षित पाण्याचा सध्या मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असल्याने तलावात केवळ साडेचार टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर येथील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार असून वन्य प्राण्यांचे मात्र मोठे हाल होणार आहेत.

पाटबंधारे विभागाकडून वीज वितरणला वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले आहे. उपसा सुरू असल्यास अधिकृत कारवाई केली जाईल. संजय आवताडे उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग करमाळा.

पाटबंधारे विभागाने तलावात पंधरा टक्के पाणी राहीले की याकडे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले. ही बाब गंभीर असून याचा परिणाम येथील नागरिकांना व मुक्या प्राण्यांना भोगावा लागणार आहे. वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेतली नाही तर आम्ही कायदेशीर मार्गाने याचा जाब विचारणार आहोत.

- अंकुश शिंदे, सरपंच पोथरे

यावर्षी दुष्काळी स्थिती आहे हे माहीत असूनही तलावातील आरक्षित पाण्याचे नियोजन झाले नाही. प्रशासनाकडून कागदी घोडे रंगवले जातात. हे थांबने गरजेचे असून आहे हे पाणी तरी पिण्यासाठी ठेवले जावे.

- हरिश्चंद्र झिंजाडे, पोथरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()