अनैतिक संबंध नसतानाही झाली मारहाण; मग त्याने कवटाळले मृत्यूला

बिजवडी येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
crime
crimesakal
Updated on

माळीनगर (जि. सोलापूर) : बिजवडी येथे महिलेशी अनैतिक संबंध (Immoral relations) नसताना तिच्याशी अनैतिक संबंध आहेत असे म्हणूून गावातील काहींनी मारहाण केल्याने मन दुखावल्यामुळे बिजवडी (ता.माळशिरस) येथे एकाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली आहे.

crime
Corona Precaution : कोरोना, ओमिक्रॉनला घाबरू नका; अशी घ्या काळजी...

सुनील ज्ञानोबा शिंदे (वय 45) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.ही घटना 7 जानेवारीच्या रात्री दोन ते 8 जानेवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.अक्षय सुनिल शिदे याने याबाबतची फिर्याद पोलिसात दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सुनिल ज्ञानोबा शिंदे (रा.बिजवडी) यास तुकाराम दत्तू शिंदे रा. रावबहाद्दूर गट (बिजवडी) याने अकलूज येथील सरकारी दवाखान्याजवळ बोलावून हरीभाऊ महादेव ढोबळे,काशिनाथ विठ्ठल ढोबळे सर्व रा. रावबहाद्दूर गट (बिजवडी) यांनी सुनिल शिंदे यास मोटार सायकलवर पंचवटी येथे नेले.गावातील महिलेशी अनैतिक संबंध ठेवतोस काय म्हणून शिवीगाळ,दमदाटी करुन हाताने,लाथाबुक्यांनी मारहाण केली.

crime
कोविडकाळात शेकडो कोटींची लूट; ठाकरे-पवारांवर सोमय्यांचे नवे आरोप

त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याचे घरी नेऊन घरासमोर हरीभाऊ महादेव ढोबळे,महादेव सोपान ढोबळे, काशिनाथ विठ्ठल ढोबळे,युवराज दत्तू ढोबळे यांनी महिलेस तेथे आणून सुनिल शिंदे यास,तू या महिलेशी अनैतिक संबंध ठेवले आहेत,तू हिला तुझे घरी ठेवून घे,तिला संभाळ,तू जर तिला संभाळले नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून शिवीगाळ,दमदाटी करुन हाताने मारहाण केली.त्यामुळे सुनिल शिंदे याचे मन दुखावल्यामुळे त्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपूजे,अकलुजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेब कुंभार,विशाल घाटगे,नितीन लोखंडे या पोलिसांनी आरोपीस पकडून तपास अधिकारी वैभव मारकड यांनी सदर आरोपींना अटक करुन पोलीस कोठडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.