गौरी- गणपतीचा उत्सव संपून आता दिवाळी तोंडावर आली, तरीदेखील रेशन दुकानांमधून सामान्य लाभार्थींना आनंदाचा शिधा मिळालेला नाही.
सोलापूर : राज्यातील ३३ लाखांहून अधिक सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना गौरी- गणपतीचा शिधा अजूनही मिळाला नाही. त्याचे वाटप विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) आचारसंहितेमुळे थांबले. कारण, तो शिधा ज्या पिशवीतून द्यायचा आहे, त्यावर सत्ताधारी नेत्यांचे फोटो आहेत. ’सकाळ’च्या दणक्यानंतर धान्य गोदामात पडून असलेला आनंदाचा शिधा (Anandacha Shida 2024) त्या पिशवीशिवाय वाटप करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.