अकलूजमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस पेट्रोल-डिझेलचा अभिषेक!

अकलूजमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस पेट्रोल-डिझेलचा अभिषेक! महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
अकलूजमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस पेट्रोल-डिझेलचा अभिषेक!
अकलूजमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस पेट्रोल-डिझेलचा अभिषेक!Sakal
Updated on
Summary

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यास वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले.

लवंग (सोलापूर) : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अकलूजमधील (Akluj) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज कार्यालयाकडे देण्यात आले. निवेदन मंडलधिकारी चंद्रकांत भोसले यांनी स्वीकारले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची प्रतिमा गॅस टाकीवर ठेवून डिझेल (Diesel)- पेट्रोलने (Petrol) अभिषेक करण्यात आला व पंतप्रधान मोदी यांच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या.

अकलूजमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस पेट्रोल-डिझेलचा अभिषेक!
नवीन 'सीपीं'चा दणका! विजापूर नाक्‍याचे वरिष्ठ PI पाटील निलंबित!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद, लक्षवेधी सेना अध्यक्ष अनिल साठे, प्रदेशाध्यक्ष अमित भिंगारदिवे, मैत्री प्रतिष्ठान अध्यक्ष महेश शिंदे, जनसेवा संघटनेचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे, लक्षवेधी सेनेचे धवल कांबळे, सामाजिक न्यायचे तालुका कार्याध्यक्ष आकाश लोखंडे, समता परिषदेचे पिंटू एकतपुरे, बहुजन ब्रिगेडचे धनाजी पाटील, भारती दलित महासंघाचे संतोष खंडागळे, सन्मित्र संघाचे सुरेश गंभीरे, मनसेचे शहराध्यक्ष सुदाम आवारे, बहुजनचे शहराध्यक्ष उदय कांबळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख, आदित्य काकडे, जावेद बागवान, राजू बागवान, रफिक मुलाणी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अकलूजमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस पेट्रोल-डिझेलचा अभिषेक!
पदाचा गैरवापर, फसवणुकीचा ठपका! DCC सरव्यवस्थापक मोटे यांना नोटीस

गॅस, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल तसेच इतर जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्य जनतेचे रोजचे नियोजन कोलमडले आहे. ऐन दिवाळी सणाच्या वेळेस महागाई मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने अनेकांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडूच होणार असून गॅस, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल यांच्या किमती तत्काळ कमी करून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून दिशाभूल केल्याने त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.