भांबेवाडीमध्ये बिबट्याचा शेतातील रस्त्यावरच ठिय्या

बिबट्याचा वावर
बिबट्याचा वावर
Updated on
Summary

या भागातील शेतकरी धास्तावल्याचे चित्र दिसत आहे.

मोहोळ (सोलापूर) : भांबेवाडी येथील नरखेडकर यांच्या शेतातील शेतमजुरांना सकाळच्या प्रहरी बिबट्याचे दर्शन झाल्याने शिरापूर (सो) गावासह आसपासच्या परिसरामध्ये बिबटयाच्या वास्तव्यास पृष्ठी मिळाली आहे. परिणामी आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्याही शेतामध्ये बिबट्या केव्हाही येऊ शकतो. या भितीने शिरापूर, भांबेवाडी या गावासह आष्टी, हिंगणी (नि), खुनेश्र्वर, कोळेगांव व भोयरे या भागातील शेतकरी धास्तावल्याचे चित्र दिसत आहे.

बिबट्याचा वावर
60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ

याबाबत अधिक वृत्त असे की, शनिवारी (ता.सात) रोजी सकाळी भांबेवाडी येथील शेतकरी सुभाष नरखेडकर मुळ गांव अनगर यांच्या शेतातील शेतगडी याला शेतामध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास ऊसाजवळच्या रस्त्यावरच बिबट्यासदृश्य प्राणी बसलेला दिसला होता. त्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास नरखेडकर यांच्या शेतातील शेतमजूर महेश शिंदे, भगवान भुसारे, जांबुवंत माणिक साबळे, शिवाजी मंच्छीद्र पाटोळे, आदी चारजण शेतातून जात असताना त्यापैकी एकाने सहज पाठीमागे वळून पाहिले असता त्यांनी आलेल्या त्याच रस्त्याजवळील उसातून बिबट्या बाहेर येताना त्यांच्यासह इतर तिघांनीही पाहिला. तत्पुर्वी शुक्रवारी रात्री भांबेवाडी येथील शेतकरी सोन्याबापू पाटील यांची मुलगी प्रियांका पाटील हिने बिबट्यास पाहिले होते.

बिबट्याचा वावर
दारुड्या बापानेच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

सदर घटना वनखात्याला समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार, वनमंडल अधिकारी डी.डी.साळुंखे, वनरक्षक सचिन कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत बिबट्याला पकडण्यास पिंजराही तिथे ठेवण्यात आला असून त्यामध्ये भक्ष्य म्हणून कोंबडया ठेवण्यात आल्या आहेत. याचबरोबर भांंबेवाडीच्या ग्रामपंंचायतीसह आसपासच्या गावातील ग्रामपंचायतीनाही नागरिकांना हलगीद्वारे सावधानेच्या सूचना सांगून कोणती काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यासाठी सांगितले आहे. यावेळी तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी वनखात्याचे कर्मचारी प्रामुख्याने वनरक्षक सचिन कदम, संतोष झेंडगे, रावसाहेब माने, दत्ता जाधव विशिष्ठ अंतरावर ठाण मांडून आहेत.

बिबट्याचा वावर
देवकार्य संपवून परतताना तलावात बुडून तिघांचा मृत्यू

बिबट्या या वन्यजीव प्राण्याची भिती घेण्यापेक्षा मागील एका वर्षापासून काही ठराविक कालावधीकरिता या भागातील त्याचे वास्तव्य व त्याची भक्ष्य शोधण्याची पध्दत पाहिल्यास शेतकरी व नागरिकांनी यापुढे न घाबरता बिबट्यासह जगण्याची मानसिकता ठेवावी. व स्वत:सह संपुर्ण कुंटुबीय, पाळीव जनावरे याबाबत सावधानता बाळगत वस्ती, घरे यांच्यासमोर रात्री उजेड असावा, शेतामध्ये फिरताना हातामध्ये एखादी काठी, टॉर्च असावी. मोबाईलवरील गाण्याचा आवाज असावा, लहान मुलांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष असावे.

- सोमानंद डोके, वाईल्ड अॅनिमल कॉझरवेशन्स सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.