अखेर पंढरपुरात संचारबंदी विरोधातील व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित !

अखेर पंढरपुरात संचारबंदी विरोधातील व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित ! प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका
अखेर पंढरपुरात संचारबंदी विरोधातील व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित
अखेर पंढरपुरात संचारबंदी विरोधातील व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगितCanva
Updated on
Summary

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून (ता. 13) अनिश्‍चित काळासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूरसह जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून (ता. 13) अनिश्‍चित काळासाठी जिल्हा प्रशासनाने (District Administration) पंढरपूरसह (Pandharpur) जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पंढरपुरात या विरोधात व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडून विरोध केला होता. त्यावर पोलिस (Police) आणि व्यापाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर प्रशासनाच्या विरोधात सुरू केलेले आंदोलन स्थगित करत प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर (Satyavijay Moholkar) यांनी जाहीर केले.

अखेर पंढरपुरात संचारबंदी विरोधातील व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित
पंढरपूरसह पाच तालुक्‍यांत आजपासून कडक निर्बंध !

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar)यांनी पंढरपूरसह माढा, करमाळा, सांगोला व माळशिरस या तालुक्‍यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश काढले आहेत. त्याची आजपासून (ता. 13) कडक अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेच्या विरोधात पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. तीन दिवसांच्या आंदोलनानंतरही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यावर व्यापाऱ्यांनीही दुकाने उघडणार अशी विरोधी भूमिका घेतली होती. सकाळी काही भागात दुकाने उघडल्यानंतर पोलिसांनी ती बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनीही सामंजस्याची भूमिका घेत दुकाने बंद केली.

व्यापाऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

सकाळी दुकाने उघडल्यानंतर पोलिसांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यावर व्यापाऱ्यांना पोलिसांच्या दडपशाहीविरोधात प्रदक्षिणा मार्गावरच रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. या वेळी अनेक व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. व्यापारी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. या वेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आनंद माळी यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी आंदोलन मागे घेतल्याचेही जाहीर केले.

अखेर पंढरपुरात संचारबंदी विरोधातील व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित
घरफोडी! दोन सराईत गुन्हेगारांना अटक; 2.84 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

व्यापाऱ्यांमध्ये एकी नसल्याचे चित्र

संचारबंदीच्या विरोधात शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित दुकाने सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती. गुरुवारपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवणार असे जाहीर केले होते. शुक्रवारी (ता. 13) सकाळी मंदिर परिसरासह इतर भागातील काही तुरळक दुकाने सुरूही केली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. इतर ठिकाणची दुकाने मात्र उघडली गेली नाहीत. त्यामुळे दुकाने उघडी ठेवण्याच्या व्यापारी महासंघाच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचेही या वेळी दिसून आले. दुकाने सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर व्यापाऱ्यांमध्ये एकी नसल्याचेही चित्र या वेळी दिसून आले.

भाविकांची गैरसोय...

पंढरपूर शहरात संचारबंदी लागू केली असली तरी एसटी आणि खासगी प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आज विठ्ठल दर्शनासाठी बाहेरगावाहून अनेक भाविक पंढरपुरात आले होते. परंतु शहरातील हॉटेल, उपाहारगृहे, कॅंटीन आदींसह इतर प्रासादिक वस्तूंची दुकाने बंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली. यामुळे अनेक भाविकांना मन:स्ताप देखील सहन करावा लागला. अनेक भाविकांना उपाशीपोटी आपल्या गावी परतावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.