Guinness Book of World Records : बारा वर्षांच्या कृष्णाचे गीतेतील ७०० श्लोक मुखोद्‌गत ; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून दखल

कोरोनाचा कार्यकाळ सर्वांसाठीच धक्कादायक आणि तितकाच धोकादायक सुद्धा होता. याच काळात सकारात्मक विचार करून येथील अनिल नगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या अवघ्या बारा वर्षाच्या कृष्णा शिंदेने लॉकडाउनचा सकारात्मक उपयोग करून संपूर्ण गीता मुखोद्‌गत‌ करण्याचे कसब लिलया पेलले आहे.
Guinness Book of World Records : बारा वर्षांच्या कृष्णाचे गीतेतील ७०० श्लोक मुखोद्‌गत ; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून दखल
Updated on

पंढरपूर : कोरोनाचा कार्यकाळ सर्वांसाठीच धक्कादायक आणि तितकाच धोकादायक सुद्धा होता. याच काळात सकारात्मक विचार करून येथील अनिल नगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या अवघ्या बारा वर्षाच्या कृष्णा शिंदेने लॉकडाउनचा सकारात्मक उपयोग करून संपूर्ण गीता मुखोद्‌गत‌ करण्याचे कसब लिलया पेलले आहे. एकाग्रता आणि आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्याच्या या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली आहे.

Guinness Book of World Records : बारा वर्षांच्या कृष्णाचे गीतेतील ७०० श्लोक मुखोद्‌गत ; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून दखल
Guinness World Record : पठ्ठ्याने दाताने ओढला 15 टनाचा ट्रक, गिनीज बुकात नोंद, Video Viral

कोरोनाच्या काळामध्ये सगळीकडेच लॉकडाउन होता. संपूर्ण जग या काळात ठप्प झालेले होते. त्यामुळे कोणालाही या काळात घराबाहेर पडता येत नव्हते. अशा कठीण काळात त्यावेळी नऊ वर्ष वयाच्या कृष्णाने मोबाईल तसेच धार्मिक ग्रंथातून गीतेचे एक नाही, दोन नाही तर तब्बल ७०० श्लोक मुखोद्‌गत केले होते. दोन, तीन वर्षाच्या सरावानंतर कृष्णाने ५५ मिनिट आणि ५१ सेकंदामध्ये ७०० श्लोक न अडखळता म्हणून दाखविले आहेत. त्याच्या याच कामगिरीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. लवकरच ही मंडळी येथे येऊन त्याच्या या देदीप्यमान कामगिरीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद घेणार आहेत.

Guinness Book of World Records : बारा वर्षांच्या कृष्णाचे गीतेतील ७०० श्लोक मुखोद्‌गत ; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून दखल
World Record : गजानन मिसाळचा जागतिक विक्रम; दुचाकीवर हात सोडून १११ किलोमीटरचा प्रवास

परिस्थिती नसताना देखील मागे न हटता मोठ्या जिद्दीने सराव करीत कोरोनातील लॉकडाउनमुळे मिळालेल्या शाळेच्या सुट्टीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेऊन जागतिक रेकॉर्ड बनवता येऊ शकते, हेच कृष्णाने आपल्या एकाग्रता आणि बुद्धी चातुर्याने अधोरेखित केले आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

५५ मिनिटात म्हटली संपूर्ण भगवतगीता

उत्तर प्रदेशातील इस्कॉनच्या गुरुकुलमध्ये कृष्णा सध्या शिक्षण घेत आहे. गीतेच्या श्लोकांचे तो वारंवार पाठांतर करायचा. त्यांच्या प्रभुजी किंवा आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने गीतेच्या श्लोक म्हणण्याचा एक व्हिडिओ बनविला. पण श्लोक पाठांतराच्या अगोदरच ७३ मिनिटांचे एक वर्ल्ड रेकॉर्ड होते. त्यानंतर यापेक्षा कमी वेळात सर्व श्लोक म्हणण्याचा त्याने सराव केला. सरावानंतर अवघ्या ५५ मिनिटं आणि ५१ सेकंदात संपूर्ण भगवतगीता त्याने म्हणून दाखविली. त्याचा हा तयार केलेला व्हिडिओ त्याच्या आचार्यांनी वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठविला होता. या व्हिडिओची दखल घेऊन तेथील पदाधिकारी लवकरच पंढरपुरात येणार असल्याची माहिती त्याच्या आई-वडिलांनी दिली.

लर्न गीता डॉट कॉमवरुन घेतले गीतेचे धडे

कोरोनाच्या अगोदर शाळेत असताना एका मित्राने मोबाईलवर लर्न गीता डॉट कॉमवर गीतेच्या श्लोकाचे शिक्षण दिले जात असल्याची माहिती कृष्णाला दिली. त्या प्रमाणे शाळा सुटल्यानंतर तो मोबाईलवरून दररोज तीन श्लोकांचे अध्ययन करीत होता. मात्र पुढे कोरोनातील लॉकडाउनच्या संधीचा फायदा घेऊन सर्व श्लोक पाठ करण्यावर भर दिल्याचे कृष्णा सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.