नववीतील मुलाचा प्रयोग! शेतकऱ्यांसाठी बनविली जादूची काठी

मागीलवर्षीच्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून त्याची निवड राज्यस्तरावर झाली आहे.
नववीतील मुलाचा प्रयोग! शेतकऱ्यांसाठी बनविली जादूची काठी
Updated on
Summary

मागीलवर्षीच्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून त्याची निवड राज्यस्तरावर झाली आहे.

सोलापूर : शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर उपाय म्हणून सोलापुरातील (Solapur) नूतन विद्यालयातील नववीत शिकत असलेल्या कैलास विलास इंगळे (Kailas Ingle) या विद्यार्थ्याने बहुपयोगी काठी तयार केली आहे. मागीलवर्षीच्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून त्याची निवड राज्यस्तरावर झाली आहे.

नववीतील मुलाचा प्रयोग! शेतकऱ्यांसाठी बनविली जादूची काठी
कोरोनाबाधित शिक्षकांना रजेची सवलत! पाचवी, आठवीची 'Scholarship' फेब्रुवारीत

जिल्हास्तरावरील प्रदर्शनात सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील विविध विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील निवडक वस्तूंची निवड राज्यस्तरावरील अवॉर्डसाठी झाली. त्यात नूतन विद्यालयातील कैलास इंगळे या मुलाने तयार केलेली "शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी काठी' (Multipurpose Stick for farmers) आता राज्यस्तरावर गेली आहे. प्रशालेतील शिक्षक अमित दुरूगकर (Amit Durugkar) यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासने ती काठी तयार केली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याला रात्रीअपरात्री शेतात जावे लागते. शेती कामांसाठी मजुरी वाढल्याने अनेकदा त्याला वेळेवर कामे करता येत नाहीत. त्या बाबींचा विचार करून कैलासने त्या बळीराजासमोरील अडचणी दूर व्हाव्यात या हेतूने बहुपयोगी काठी तयार करण्याचा निश्‍चय केला.

नववीतील मुलाचा प्रयोग! शेतकऱ्यांसाठी बनविली जादूची काठी
राज्याची ऐतिहासिक मनुष्यहानी! दोन वर्षांत पावणेदोन लाख मृत्यू

चित्रपट अथवा मनोरंजन मालिकांमध्ये पाहिलेली जादुची काठी, आपणही शेतकऱ्यांसाठी तयार करू शकतो, ही कल्पना करून त्याने त्यावर काम करायला सुरवात केली. रात्री शेतात काम करताना विजेरी (टॉर्च) म्हणून, टेस्टर आणि कापणी यंत्र, फवारणी यंत्र म्हणून एकाच काठीचा वापर करता यावा म्हणून त्याने तसा प्रयोग केला. त्याच्या यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्‍वस्त भूषण शहा, पराग शहा, प्राचार्य आशितोष शहा, मुख्याध्यापक अजित हेरले यांनी कैलास इंगळे या विद्यार्थ्याचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

काठीची वैशिष्टे...

- ही बहुपयोगी काठी जलरोधक असल्याने आहे टिकाऊ

- रात्रीच्यावेळी शेतात काम करताना टॉर्च म्हणूनही काठीचा उपयोग

- विविध पिकांची कापणी करतानाही होईल काठीचा वापर

- शेतातील वेगवेगळ्या पिकांवरील किटकनाशके फवारणीसाठीही काठी उपयोगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()