सोलापूर जिल्ह्यात 40 हजार शेतकऱ्यांना कर्जच नाही

11 बॅंकांचे 50 टक्‍केही कर्ज वाटप नाही
crop loan.jpg
crop loan.jpg
Updated on
Summary

जिल्ह्यातील 11 बॅंकांनी उद्दिष्टाच्या 50 टक्केही कर्ज वाटप केले नसल्याचे समोर आले आहे.

सोलापूर: पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे खरीप हंगाम संपत आला, तरीही बॅंकांनी जिल्ह्यातील 40 हजार शेतकऱ्यांना कर्जच दिलेले नाही. जिल्ह्यातील 11 बॅंकांनी उद्दिष्टाच्या 50 टक्केही कर्ज वाटप केले नसल्याचे समोर आले आहे.

crop loan.jpg
ऑनलाइन परीक्षेत अडथळा, सोलापूर विद्यापीठाकडे 285 अर्ज

जिल्ह्यातील 22 बॅंकांना यंदाच्या खरीप हंगामात जवळपास सव्वालाख शेतकऱ्यांना एक हजार 426 कोटी 27 लाखांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने दिले. सप्टेंबरपर्यंत बॅंकांनी हे उद्दिष्ट पूर्ण करणे अपेक्षित आहे. आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, फेडरल बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, एचडीएफसी व इंडूस्लंड बॅंक वगळता उर्वरित बॅंकांचे कर्जवाटप कमी आहे. तब्बल 11 बॅंकांचे कर्जवाटप 50 टक्‍क्‍यांहून कमी असल्याची बाब समोर आली आहे.

crop loan.jpg
प्रांताधिकारी ढोले यांच्याकडे पुण्याचा अन्नधान्य वितरणचा पदभार

खरीपात शेतकऱ्यांना बॅंकांकडून कर्ज मिळावे, कोणाचीही अडवणूक होऊ नये, अशा सक्‍त सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वारंवार बैठका घेऊन बॅंकांच्या अधिकाऱ्यांना केल्या. तरीही, त्यांचे निर्देश बाजूला ठेवून काही बॅंकांची मनमानी सुरु केल्याची चर्चा आहे. त्यामुळे 39 हजार 780 शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नसून पुढील दीड महिन्यात तरी, बॅंका जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

crop loan.jpg
सोलापूर ग्रामीणमध्ये आठवड्यात वाढले 3312 कोरोना रुग्ण

कर्ज वाटपात पिछाडीवर बॅंका

जिल्ह्यातील 22 बॅंकांच्या 536 शाखांमधून शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित आहे. परंतु, युनियन बॅंक, आयडीबीआय, सेंट्रल बॅंक, कॅनरा बॅंक, इंडिया ओव्हरसिज बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, रत्नाकर बॅंक, इंडियन, युको व कर्नाटक बॅंक यांनी राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या उद्दिष्टानुसार 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी शेती कर्जाचे वाटप केले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या बॅंका कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठतील का, याची उत्सुकता आहे. बॅंकांनी अजून 388 कोटी 33 लाखांचे कर्ज वाटप केल्यानंतर उद्दिष्टपूर्ती होणार आहे.

crop loan.jpg
भांबेवाडीमध्ये बिबट्याचा शेतातील रस्त्यावरच ठिय्या

खरीप कर्ज वाटपाची सद्यस्थिती

- कर्ज वाटपाचे उद्दिष्ट- 1,426.27 कोटी

- शेतकरी कर्जदारांचे उद्दिष्ट- 1,25,163

- बॅंकांकडून कर्ज वाटप- 1,037.94 कोटी

- कर्ज न मिळालेले शेतकरी- 39,780

crop loan.jpg
60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ

रब्बीसाठी 2358 कोटींचे उद्दिष्ट

एक ऑक्‍टोबरपासून रब्बी हंगामाला सुरवात होणार आहे. या हंगामात जिल्ह्यातील जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना बॅंकांनी दोन हजार 358 कोटी 57 लाखांचे कर्जवाटप करावे, असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक वाटा जिल्हा बॅंकेचा असणार आहे. दरम्यान, जिल्ह्याची ओळख आता खरीपाचा जिल्हा होऊ लागला असून रब्बी पिकांची लागवड कमी होत असल्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे बॅंकांकडून रब्बी हंगामातील उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.