सोलापूर : 24 तासात कोरोनाचे 479 नवीन रुग्ण; तर सहा जणांना म्युकरमायकोसिस

Mucormycosis
MucormycosisEsakal
Updated on
Summary

सर्वसामान्यांना कोरोनाची भीती आहे. तर कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकरमायकोसिसची चिंता सतावू लागली आहे. जिल्ह्यातील 401 रुग्णांपैकी 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर : कोरोनाचा (Corona) ग्रामीण भागातील प्रादुर्भाव अजूनही अपेक्षेप्रमाणे कमी झाला नसून शहरातही दररोज 20 ते 22 च्या सरासरीने रुग्ण आढळत आहेत. नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली असून कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकरमायकोसिसची (mucormycosis) चिंता सतावू लागली आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे 479 रुग्ण वाढले असून शहरातील दोन तर ग्रामीणमधील 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे म्युकरमायकोसिसचे (mucormycosis) सहा रुग्ण वाढले (increase of six patients) असून रविवारी दोघांचा या आजाराने बळी घेतला आहे. (In Solapur district, there has been an increase of six patients with mucormycosis)

Mucormycosis
'MPSC'ने वर्षापूर्वी शिफारस करुनही 413 उमेदवारांना नियुक्ती नाहीच

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सुरक्षित राहिलेल्या गावांपर्यंत दुसरी लाट पोहचली. शहरातील रुग्णसंख्या कमी होत असतानाही ग्रामीण भागात दररोज चारशेहून अधिक रुग्ण आढळत आहेत. चिंतेची बाब म्हणजे मागील 30 ते 35 दिवसांपासून दररोज सरासरी 25 ते 28 रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यात को-मॉर्बिड रुग्णांसह तरुणांचाही समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी अक्‍कलकोट, करमाळा, माढा, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांमध्ये एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. मात्र, बार्शी व सांगोल्यातील प्रत्येकी दोन, माळशिरस, मोहोळ, उत्तर सोलापूर या तालुक्‍यांतील प्रत्येकी चौघांचा तर पंढरपूर तालुक्‍यातील पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Mucormycosis
आरोग्याधिकाऱ्यांचे छाटले पंख! बदली अन्‌ औषध खरेदीचे काढले अधिकार

शहरात रविवारी 22 रुग्ण वाढले असून सध्या 284 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ग्रामीणमधील तीन हजार 892 रुग्ण विविध हॉस्पिटलमधून उपचार घेत आहेत. दुसरीकडे म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत 401 रुग्ण वाढले असून त्यातील 31 रुग्णांचा मृत्यू झाला असून 158 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Mucormycosis
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही

महापालिका प्रशासनाला नाही गांभीर्य

शहरात एकूण 26 प्रभाग असून त्यापैकी बहुतांश प्रभाग आता कोरोनामुक्‍त झाले असून काही प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे आज प्रभाग क्रमांक 25 मध्ये सर्वाधिक पाच तर 23 व 24 या प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहरातील 22 ते 26 या प्रभागांमध्येच सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. हा अनुभव पाठिशी असल्याने पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी त्यासंबंधी अभ्यास करून पोलिसांच्या मदतीने त्याठिकाणी काही उपाययोजना करता येतील का, याचा आढावा घेतला. मात्र, महापालिका प्रशासनाने त्यासंदर्भात काहीच पाऊल उचलले नसल्याने पुन्हा शहरात रुग्ण वाढतील का, अशी भीती व्यक्‍त केली जात आहे.

Mucormycosis
दहावीचा निकाल जुलैमध्ये तर ऑगस्टमध्ये बारावीचा निकाल

जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती

एकूण टेस्ट : 15,36,792

आतापर्यंत पॉझिटिव्ह : 1,54,769

एकूण मृत्यू : 4,118

बरे झालेले रुग्ण : 1,46,475

(In Solapur district, there has been an increase of six patients with mucormycosis)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.