सोलापूरात ज्येष्ठ नागरिक ठरताहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी

दहा दिवसांत २६ मृत्यू; सक्रिय रुग्ण साडेपाच हजारांवर
corona update
corona update sakal
Updated on

सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट दिवसेंदिवस वाढत असतानाही लोक बिनधास्तपणे गर्दीतून फिरतान दिसत आहेत. चिंतेची बाब म्हणजे १४ ते २३ जानेवारी या काळात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरातील दोन हजार १८२ तर ग्रामीणमधील तीन हजार ३१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक रुग्ण ६० वर्षांवरील आहेत.शहर असो वा ग्रामीणमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी असतानाही रुग्णवाढ मोठी आहे. बहुतेक रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, तरीही रुग्णवाढ चिंताजनक आहे. अनेक शासकीय सेवेतील कर्मचारी या लाटेत बाधित झाले आहेत. रविवारी (ता. २३) ग्रामीणमध्ये एक हजार ८७४ संशयितांमध्ये ५८६ |तर शहरात ७०५ संशयितांमध्ये १७१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक १२८ तर पंढरपूर तालुक्‍यातील १०९ जणांना कोरोनाची बाधा झाली. तसेच माढ्यातील ८९ आणि माळशिरस तालुक्‍यात ५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर शहरातील

corona update
घरे महाग तरीही व्याजदराचा दिलासा

तीन आणि ग्रामीणमधील तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील उत्तर कसबा परिसरातील ७८ वर्षीय महिला तर ७७ वर्षीय पुरुषाचा आणि सिध्देश्‍वर पेठेतील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दुसरीकडे ग्रामीणमधील नवीन विडी घरकूल (ता. दक्षिण सोलापूर) येथील ८५ वर्षीय पुरुष, रामकृष्ण नगर (रा. कुर्डूवाडी, ता. माढा) आणि मैंदर्गी (ता. अक्‍कलकोट) येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यातील काहीजण विलंबाने दवाखान्यात दाखल झाले होते तर काहींनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत.

corona update
निर्बंध पाळा अन्यथा आता थेट कारवाई ! शहर-जिल्ह्यातील 65 हजार 478 जणांना झाली कोरोनाची बाधा; आज दहा मृत्यू तर वाढले 650 रुग्ण

सर्वाधिक रुग्ण ३१ ते ५० वयोगटातील

कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये आतापर्यंत पाच हजार १६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्यानंतर सद्यस्थितीत शहर-ग्रामीणमधील सक्रिय रुग्णांची संख्या २० दिवसांतच पाच हजार ४९६ एवढी झाली आहे. दररोज सातशेहून अधिक रुग्ण वाढत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे घरातील कर्त्यांचाच त्यात सर्वाधिक समावेश आहे. ० ते ३० वयोगटातील ३७ टक्‍के तर ३१ ते ५० वयोगटातील ५५ टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.