10 ऑगस्ट रोजी गणपतराव देशमुखांच्या जयंतीदिनी देशमुख कुटुंबीय व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एकाचवेळी 1 मिनिटांत 1 हजार 95 झाडांचे रोपन केले जाणार आहे.
सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सिमेवरील डिकसळ गावाच्या हद्दीतील वायफळ घाटालगत 'भाईंची देवराई' हा अभिनव उपक्रम साकारण्यात येत आहे.
10 ऑगस्ट रोजी गणपतराव देशमुखांच्या जयंतीदिनी देशमुख कुटुंबीय व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एकाचवेळी 1 मिनिटांत 1 हजार 95 झाडांचे रोपन केले जाणार आहे. डिकसळ गावातीलच नाना हालंगडे यांनी स्वत:ची 2 एकर शेतजमीन या अभिनव प्रकल्पासाठी समर्पित केली आहे. डिकसळ ग्रामस्थ, आर्ट ऑफ लिव्हिंग व शेकापच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला बळ दिले आहे. या उपक्रमात विविध 128 प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये देवराई, घनवण, फळबाग या प्रकारची झाडांची वर्गवारी करण्यात आली आहे. आंबा, चिंच, पिंपळ, नारळ, जांभूळ, पेरू, सिताफळ आदींसोबत औषधी वनस्पतींचाही यात समावेश आहे.
वृक्ष ग्रंथालयही साकारणार...
या प्रकल्पामध्ये वृक्षांचे संवर्धन, पर्यावरण रक्षणाचे मोठे काम होणार आहे. फळझाडे, दुर्मिळ तसेच औषधी वनस्पती, ऑक्सिजन निर्माण करणारी वृक्षराजी येथे असणार आहे. येथे भेट देण्यासाठी येणाऱ्यांसाठी बसण्याची सुविधा दिली जाणार आहे. या वृक्ष ग्रंथालयात क्यू-आर कोडची सुविधा उपलब्ध असेल. मोबाईलद्वारे क्यू-आर कोड स्कॅन करून प्रत्येक झाडांचे महत्त्व, वैशिष्ट्ये, उपयुक्तता आदींची माहिती प्राप्त करून घेता येईल. प्रत्येक झाडांना नामफलक लावले जाणार आहेत. या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन केले जाणार आहे.
पुण्याच्या देवराई फाऊंडेशनचे पाठबळ...
या प्रकल्पासाठी पुणे येथील देवराई फाऊंडेशन ही संस्था झाडे देणार आहे. देवराई संस्थेचे संस्थापक रघुनाथ ढोले हे सक्रियपणे या प्रकल्पास सहाय्य करीत आहेत. झाडांसाठी लागणारी खते, क्यू-आर कोड तसेच मार्गदर्शनही करणार आहे. झाडांचे संगोपन, पाणी व्यवस्था, पायाभूत सुविधा, झाडांसाठीचे खड्डे ही व्यवस्था प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक डॉ. नाना हालंगडे हे सर्वांच्या मदतीतून करणार आहेत. विरंगुळा व निसर्गरम्य वातावरणात काही क्षण व्यतित करण्याची संधी मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. या प्रकल्पाला मदत करू इच्छिणाऱ्यांनी नाना हालंगडे (7821831606) यांच्याशी संपर्क साधावा असे त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.