Solapur News : यंदाच्या युवा महोत्सवात लोककला प्रकारांचा समावेश; कुलगुरु डॉ. कामत यांचा निर्णय

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीला विशेष महत्त्व असून विद्यार्थ्यांचा समग्र व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याचा त्यातून प्रयत्न आहे.
punyashlok ahilyabai holkar solapur university
punyashlok ahilyabai holkar solapur universitysakal
Updated on

सोलापूर - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीला विशेष महत्त्व असून विद्यार्थ्यांचा समग्र व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याचा त्यातून प्रयत्न आहे. या अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यंदाच्या युवा महोत्सवात भजन, भारुड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली आणि लावणी या लोककला प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये भारतीय लोककला प्रकारांचा समावेश करण्याची मागणी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे यांच्यासह विविध संघटनांनी केली होती. या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी युवा महोत्सवात त्या कला प्रकारांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय लोककला व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने भजन, भारुड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली आणि लावणी या कलाप्रकारांचा समावेश करण्याची घोषणा त्यांनी केली. यातील काही कलाप्रकार युवा महोत्सवात होते, मात्र मागील सहा वर्षांपासून युवा महोत्सवातून वगळण्यात आले होते. त्यामुळे आता युवा महोत्सवात कला प्रकारांची संख्या वाढली आहे.

महाविद्यालयांची तयारी सुरु

यंदाचा युवा महोत्सव १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान पंढरपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात रंगणार आहे. संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवाची तयारी सुरू केली आहे. आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या नवीन सहा कला प्रकारांची तयारीही विद्यार्थ्यांनी करावी. चांगल्या प्रकारे कलागुण सादर करण्यासाठीही विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.