Solapur News : मसाल्याला बसला महागाईचा तडका; गृहिणींचे बजेट कोलमडले; बाजारपेठेवरही परिणाम

काश्मिरी मिरची पावडरने तर चक्क हजाराचा आकडाच ओलांडला आहे. हळदीचे भाव सुरवातीपासून चढेच असल्याने नंतर त्यात काही बदल झाला नाही.
spices
spicessakal
Updated on

सोलापूर,: बाजारपेठेत तिखटापासून सर्वच मसाल्यांनी महागाईचा तडका दिल्याने बाजार चांगलाच झणझणीत झाला आहे. काही मसाल्याचे भाव एक हजार रुपयाच्या पटीतच वाढल्याने गृहिणींचे बजेट तर कोलमडले पण त्यासोबत प्रोसेसड फूड, लोणची, पापड व पॅकबंद खाद्यपदार्थाच्या बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.

गेल्या काही दिवसात मसाल्याच्या पदार्थांच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. काही महिन्यापूर्वी जिरे अचानक हजार रुपये किलोवर गेले. नंतर दोन महिन्यापूर्वी त्याचे भाव कमी झाले. पुन्हा मागील पंधरवड्यापासून ते महागले आहे.

तिखटाने तर कहरच केला. तिखटाचे सर्वच प्रकार दोनशे ते तिनशे रुपयांनी महागले आहेत. ब्याडगी मिरची तिखट, गुंटूर मिरची, जवारी मिरचीपासून होणारे तिखटाचे प्रकार महागले आहेत. काश्मिरी मिरची पावडरने तर चक्क हजाराचा आकडाच ओलांडला आहे. हळदीचे भाव सुरवातीपासून चढेच असल्याने नंतर त्यात काही बदल झाला नाही.

spices
Solapur : 'याचा अर्थ मी काय करणार नाही असं समजू नका'; आरोग्य अधिकाऱ्याला आ.समाधान आवताडेंचा इशारा

सोलापूरच्या बाजारपेठेत सर्वाधिक विकला जाणारा पदार्थ म्हणजे काळे तिखट (येसूर) होय. काळ्या तिखटाचा वापर स्वयंपाकामध्ये सर्वाधिक केला जातो. काळ्या तिखटाचे भाव ३०० रुपयांनी वाढले आहेत. तेजपान, दगडीफूल यांचे भाव देखील अल्पप्रमाणात वाढले आहेत.

धन्याचा वापर अनेक खाद्यपदार्थांत केला जातो. धने पावडर सर्वच पॅकबंद खाद्यपदार्थ, मसाले, लोणची यामध्ये लागते. हे धने पावडर देखील देखील महागले आहेत. वेलदोड्यांनी चक्क दोन हजार रुपयांचा आकडा देखील ओलांडला आहे. त्या पाठोपाठ हिंगाने तर तीन हजाराचा आकडा गाठला आहे. फक्त मोहरी व सुक्या खोबऱ्याचा या महागाईला अपवाद आहे.

spices
Solapur : 'बेकरीजन्य पदार्थ व फास्ट फूड रोखण्याचा प्रयत्न'; ZP च्या शाळेत टिफीन मॉनेटर

आषाढात कोंबडीपेक्षा मसाला महाग

श्रावण लागण्यापूर्वी आषाढ महिन्यात मांसाहाराचे प्रमाण वाढते. मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. मात्र त्यासाठी लागणारे मसाले महागल्याने अडचण झाली आहे. त्यानंतर अधिक श्रावण व नंतर श्रावण महिना येत आहेत. सणासुदीच्या दिवसात मसाल्याचा वापर भरपूर प्रमाणात होतो. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडू लागले आहे. दाळीच्या पाठोपाठ मसाल्याचा महागाईचा त्रास होऊ लागला आहे.

मसाल्यांचे भाव (प्रतिकिलो)

हिंग- १००० रुपये

ब्याडगी मिरची तिखट- ८०० रुपये

काश्मिरी मिरची तिखट- १२०० रुपये

जिरे- ८०० रुपये

काळे तिखट- ६०० रुपये

वेलदोडे- २००० रुपये

लवंग- ८०० रुपये

हळद- २०० रुपये

नागकेशर- १६०० रुपये

धने (इंदोरी) - २०० रुपये

खसखस- १००० रुपये

काळे मिरे- ८०० रुपये

spices
Solapur Crime : पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचा कारवाईचा धडाका, मटका व जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

सर्वच मसाल्याचे पदार्थ महागल्याने अर्थातच पॅकबंद खाद्यपदार्थ, लोणची व पापड व्यवसायाला त्याची झळ बसणार आहे. त्यामुळे काळे तिखट, शेंगाचटणी व लोणच्यांचे दर वाढणार हे निश्चित.

- रमण कुलकर्णी, मसाला व्यापारी, लक्ष्मी मार्केट, सोलापूर.

-इतर क्षेत्राप्रमाणे मसाल्याला महागाईचा झटका बसला आहे. गुजरातमधून जिऱ्याची आवक घटल्याने ते महागले आहेत. तसेच इतर मसाल्याचे पदार्थ देखील महागले आहेत.

- के.उमदी, मसाला व्यापारी, सत्तरफूट रोड, सोलापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.