अक्षय कुमारच्या प्रेरणेने "तो' बनला कुक ते हॉटेल मालक !

अक्षय कुमारच्या प्रेरणेने "तो' बनला कुक ते हॉटेल मालक !
अक्षय कुमारच्या प्रेरणेने "तो' बनला कुक ते हॉटेल मालक !
अक्षय कुमारच्या प्रेरणेने "तो' बनला कुक ते हॉटेल मालक !Canva
Updated on

गुरूविना विद्या नाही, असे म्हणतात. आज कुठल्याही यशस्वी व्यक्तीमागे त्याच्या गुरूचे शिकवण असतेच.

सोलापूर : गुरूविना विद्या नाही, असे म्हणतात. आज कुठल्याही यशस्वी व्यक्तीमागे त्याच्या गुरूचे शिकवण असतेच. काही शिष्य गुरूच्या सान्निध्यात राहून विद्या शिकतात तर काही शिष्य एकलव्याप्रमाणे गुरूला लांबून पाहूनच गुरूकडून विद्यार्जन करतात. असाच प्रकार सोलापुरातील एका युवकाच्या बाबतीत घडला. त्याचा अचंबित करणारा जीवनप्रवास अनेकांना थक्क करायला लावतो. बॉलिवूडस्टार अक्षय कुमारची (Bollywood star Akshay Kumar) आजही चलती आहे. कुक ते सिनेस्टार असा त्याचा रंजक प्रवास आहे. या स्टारला गुरू, आयकॉन मानणारा अन्‌ त्याचे अनुकरण करणारा सोलापुरातील एक चाहता चक्क अक्षय कुमारप्रमाणे कुक बनला. आता त्याने स्वत:चा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. (Inspired by filmstar Akshay Kumar, a young man became from cook to hotelier-ssd73)

अक्षय कुमारच्या प्रेरणेने "तो' बनला कुक ते हॉटेल मालक !
सोलापूरच्या 'पद्म'कन्येला विदेशात एक कोटीच्या नोकरीची ऑफर !

सुरेश जगलेकर (Suresh Jaglekar) असे या अभिनेता अक्षय कुमारच्या अवलिया चाहत्याचे नाव. पूर्व भागातील पोलिस हेडक्वार्टरनजीकच्या भगवाननगर झोपडपट्टीत एका कामगार कुटुंबात सुरेशचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सुरेशला इयत्ता तिसरीत शिकत असताना शाळा सोडण्याची वेळ आली. वयाच्या सहाव्या वर्षी सुरेशला गल्लीत गणेशोत्सव मंडळाकडून पडद्यावर दाखविण्यात येत असलेला "मोहरा' सिनेमा पाहायला मिळाला. सिनेमातील अक्षय कुमारला पाहून तो प्रचंड भारावून गेला. तेव्हापासून तो अक्षय कुमारचा फॅन बनला आणि त्याच्या जीवनाला एकप्रकारे कलाटणी मिळाली.

अक्षयकुमारचे वेड लागलेल्या सुरेशने अक्षयकुमारची स्टाईल, स्टंट आत्मसात करून तसेच वावरणे सुरू केले. एका पिठाच्या गिरणीत दळण, मिरची कांडपचे काम तो करू लागला. तिथे अक्षयकुमारचे फोटो लावण्याचा सपाटा लावून त्याने अल्पावधीत "अक्षय कुमारचा जबरा फॅन' अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. जलतरण तलावातदेखील त्याने अक्षय कुमार स्टाईलमुळे सुरेश मिठ्ठाकोल यांच्यासह अनेक लोक जोडले. या लोकांच्या मदतीतून कालांतराने नोकरी सोडून त्याने विडी घरकुलमधील सोना-चांदी कॉम्प्लेक्‍स गाळ्यात स्वत:ची पीठ गिरणी सुरू केली. घरकुलच्या लोकांना सुरेशमधील अक्षय कुमारच्या वेडाचा प्रत्यय आला. एका व्यक्तीने त्याला अक्षय कुमार हा उमेदीच्या काळात कुक होता, तेव्हा तूदेखील त्याच्याप्रमाणे कुक हो, असे सुचविले. मग काय, ही आयडिया आवडल्याने भाड्याच्या गाळ्यात सुरेशने बिर्यानी हाउस सुरू केले. कुकसंदर्भात ना शिक्षण, ना प्रशिक्षण घेतलेल्या सुरेशने आपला गुरू, ऑयकॉन अक्षय कुमारच्या प्रेरणेने आज स्वत:ची जागा घेऊन तिथे हॉटेल उभारले. आज तो एक यशस्वी हॉटेलचालक म्हणून नावारूपाला आला आहे.

अक्षय कुमारच्या प्रेरणेने "तो' बनला कुक ते हॉटेल मालक !
समाधान, तू नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस - उद्धव ठाकरे

अक्षय कुमारचा सुरेशला सल्ला

अक्षय कुमारची सुरेशने अनेकदा भेट घेतली आहे. हॉटेल उद्‌घाटनासाठी येण्याचे निमंत्रण सुरेशने प्रत्यक्ष भेटून दिल्यावर अक्षयकुमार म्हणाला, माझ्यासाठी तू थांबू नको, आई-वडिलांच्या हस्ते उद्‌घाटन कर. मी कधीतरी येऊन हॉटेलला भेट देईन. यानुसार सुरेशने आपल्या पालकांच्या हस्ते हॉटेल सुरू केले. अक्षय कुमारचा वाढदिवस व नवीन सिनेमा प्रदर्शनावेळी सुरेश विविध उपक्रम हमखास राबवितो.

अक्षय कुमारमुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. ते माझे आवडते अभिनेतेच नव्हे तर गुरूदेखील आहेत. पिठाच्या गिरणीत काम करणारा माझ्यासारखा कामगार त्यांच्यामुळे आज एक यशस्वी हॉटेलचालक बनला आहे.

- सुरेश जगलेकर

सुरेश जगलेकरच्या जीवनाला मिळाली अशी कलाटणी

  • गरिबीमुळे तिसरीत असताना शाळा सोडण्याची वेळ

  • वयाच्या सहाव्या वर्षांपासून अक्षय कुमारचा फॅन

  • अक्षय कुमारच्या स्टाईलमुळे आला चर्चेत

  • अक्षय कुमारच्या वेडाने जीवनाला मिळाली कलाटणी

  • कामगार ते हॉटेलचालक असा अंचबित करणारा प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.