Inspiring Story : वाणिज्य शाखेचे ज्ञान नसतानाही सीए परीक्षा उत्तीर्ण

कौटुंबिक जबाबदारी सांभाळत माधुरी नकाते-यादव यांची यशाला गवसणी
inspiring story of non commerce student madhuri nakate yadav became ca education
inspiring story of non commerce student madhuri nakate yadav became ca educationSakal
Updated on

- उमेश महाजन

महूद : लग्नानंतर कौटुंबिक जबाबदारी सांभाळणाऱ्या सांगोला तालुक्यातील अकोला (वासूद) येथील माधुरी नकाते- यादव यांनी पुढे शिकण्याची जिद्द कायम ठेवली. प्रपंच आणि लहान मुलीला सांभाळत त्यांनी सी.ए. (चार्टर्ड अकाउंटंट)ची पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे, वाणिज्य शाखेचे कोणतेही ज्ञान नसताना त्यांनी हे यश मिळवले आहे.

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी माधुरी नकाते (यादव) या कोपटेवस्ती येथील विलास यादव यांची कन्या आहेत. २०१६ मध्ये त्यांनी बी.ई. कॉम्प्युटर ही पदवी प्राप्त केली. २०१६ मध्येच त्यांचा विवाह अकोला (वासूद) (ता. सांगोला) येथील आर.टी.ओ. इन्स्पेक्टर संजय नकाते यांच्याशी झाला. २०२० पासून त्यांनी सी.ए. बनण्याचे स्वप्न बाळगले.

धावपळीच्या या युगात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून स्पर्धात्मक अभ्यासक्रम पूर्ण करणे हे अत्यंत जिकिरीचे आहे. त्यातून घर-प्रपंच व तीन वर्षांची लहान मुलगी सांभाळत सी.ए. सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होणे मोठे कठीणच काम होते.

मात्र, शिक्षणामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत त्यांनी परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे. हे यश मिळविण्यासाठी माधुरी नकाते- यादव यांना आई, वडील, सासू, सासरे, भाऊ, पती, मामा, आजी व आजोबा यांच्याकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.

वाणिज्य शाखेचे कोणतेही ज्ञान नसताना त्यांनी कॉमर्समध्ये आवड निर्माण केली. आवडीच्या जोरावर त्यात स्वतःला झोकून दिले. कठोर परिश्रम व सातत्य राखून त्यांनी हे यश मिळविले आहे. सी.ए. होण्यासाठी सुरवातीपासूनच वाणिज्य शाखेचे ज्ञान आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने खोटा ठरवला आहे. तसेच त्यांनी शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

नकारात्मक सल्ल्यातून सकारात्मक विचार

ही परीक्षा खूप कठीण असते. तुला घर आणि मुलगी सांभाळून हे जमणार नाही, असा सल्ला काहींनी दिला. परंतु, माधुरी यांनी हा विचार सकारात्मक पद्धतीने घेतला. या अभ्यासक्रमास सुरवात केली अन् कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाला. अशा परिस्थितीत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. दररोज आठ ते नऊ तास अभ्यास केला.

अभ्यासामुळे सख्ख्या भावाच्या लग्नालाही अनुपस्थित

माझ्या मुलीने तीन वर्षाच्या लहान वयात सुद्धा खूप समजूतदारपणा दाखविला. मी अभ्यासामुळे माझ्या सख्ख्या भावाच्या लग्न समारंभालाही उपस्थित राहू शकले नाही. परंतु, त्यांनीही मला मोठ्या मनाने माफ केले. आता पदवी मिळाल्यानंतर सर्व कुटुंबाला मोठा आनंद झाल्याचे सी.ए. माधुरी नकाते-यादव म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.