शाळा सुरु होण्यापूर्वी वर्गखोल्यांची सॅनिटायझर फवारणी अन्‌ स्वच्छता बंधनकारक

जिल्ह्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत; पण पहिल्या दोन दिवसांत शिक्षकांनी शाळांमध्ये जाऊन शाळांची संपूर्ण स्वच्छता व वर्गखोल्यांमध्ये सॅनिटायझर फवारायचे आहे. १५ जूनपासून मुलांना शाळेत बोलावले जाणार असून, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तके द्यायची आहेत.
 शाळा
शाळा sakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत; पण पहिल्या दोन दिवसांत शिक्षकांनी शाळांमध्ये जाऊन शाळांची संपूर्ण स्वच्छता व वर्गखोल्यांमध्ये सॅनिटायझर फवारायचे आहे. १५ जूनपासून मुलांना शाळेत बोलावले जाणार असून, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तके द्यायची आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहून उपाययोजना करण्याचे शाळांना बंधनकारक असून, मुलांच्या आरोग्यालाच शाळांमध्ये प्राधान्य राहणार आहे.

 शाळा
महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार, पनवेल, पुणे, नागपूर या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रतिबंधित लसीमुळे बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे नाहीत. त्यामुळे शाळेची पहिली घंटा १५ जूनलाच वाजणार आहे. कोरोनावाढीचा वेग पाहून मुलांना मास्कसंबंधी सूचना केल्या जाणार आहेत. तत्पूर्वी, प्रत्येक मुलाच्या आरोग्याला प्राधान्य देत त्या शाळांनी खबरदारी घ्यायची आहे. १३ व १४ जून रोजी होणारी शाळांची स्वच्छता व वर्गखोल्यांच्या सॅनिटायझिंगवर ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने वॉच ठेवणे अपेक्षित आहे. दरम्यान, कोरोना काळात बरेच दिवस शाळा बंद राहिल्याने मुलांच्या गुणवत्ता वाढीकडे शिक्षकांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे शालेय कामाव्यतिरिक्त शिक्षकांना मोबाईल वापरण्यावर निर्बंध असणार आहेत. त्यावरही शालेय व्यवस्थापन समिती लक्ष ठेवून असणार आहे. शाळेचा पहिला दिवस मुलांच्या प्रवेशोत्सवाचा असेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.

 शाळा
तुकाराम मुंढेंची आजही सोलापूरकर काढता आठवण! सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्तच

पहिल्या दिवशी शाळांना ‘या’ गोष्टी बंधनकारक...

  • ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने शाळेची स्वच्छता करून सॅनिटायझर फवारणी झाल्याची खात्री करावी

  • विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच प्राधान्य द्यावे; परिस्थितीनुसार आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना कराव्यात

  • गावात किंवा प्रत्येक वॉर्डात देशभक्तिपर गीते लावावीत, विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढावी

  • शाळेकडे जाणाऱ्या गावातील सर्व रस्त्यांवर रांगोळी काढावी, पाण्याचा सडा मारावा

  • उंट, घोडागाडी, टांगा, बैलगाडी, दुचाकी, चारचाकीतून मुलांची सवारी करावी

  • मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत पहिल्या दिवशी जेवणात गोड पदार्थ द्यावा

  • मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करावे; मुलांच्या हस्ते हवेत फुगे सोडावेत

  • सर्व मुलांना ओळखपत्रे द्यावीत; सकाळी साडेदहा वाजता गुणवत्ता अलार्म वाजल्यावर अध्यापन सुरू करावे

 शाळा
८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत! लसीकरणामुळे मृत्यूदर घटला; ७.२५ कोटी व्यक्ती सुरक्षित

मुलांच्या अनुभवावर होतील सुधारणा...

शाळा सुरू झाल्यानंतर पहिली व दुसरीतील विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता ‘माझा आजचा दिवस’ या विषयावर त्यांचे मत व्यक्त करतील. कोरोनामुळे ते विद्यार्थी दोन वर्षांनी पहिल्यांदाच शाळेत येत आहेत. त्यामुळे मोजक्या मुलांचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवावेत. प्रत्येक तालुक्यातून दहा व्हिडिओ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविले जातील. त्या चिमुकल्यांचे व्हिडिओ पाहून आगामी काळात काही सुधारणा केल्या जाणार आहेत.

 शाळा
ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय! १० गुंठ्यांपर्यंत जमीन खरेदी-विक्रीला परवानगी

लोकप्रतिनिधी काढतील का वेळ

कोरोनाच्या संकटाशी सव्वादोन वर्षे संघर्ष केल्यानंतरही आता पुन्हा काही शहरांमध्ये कोरोना वाढतोय. तरीदेखील, १५ जूनपासून सर्व मुलांना शाळांमध्ये बोलावण्यात आले आहे. तत्पूर्वी, १३ जूनपासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेची स्वच्छता, मुलांच्या स्वागताची तयारी करायची आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी (१५ जून) ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासदार, आमदारांनी शाळांना भेटी देऊन मुलांच्या प्रवेशोत्सवात सहभागी होणे अपेक्षित आहे. आता कोणकोणते लोकप्रतिनिधी त्यासाठी वेळ काढतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 शाळा
पुरुषांपेक्षा महिलांची कोरोनाशी यशस्वी फाईट! ८६ हजार ७२७ महिलांची कोरोनावर मात

गुणवत्ता वाढीकडे अधिक लक्ष देण्याची गरज

१५ जूनपासून सर्व शाळांमध्ये विद्यार्थी येतील. तत्पूर्वी, सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून शाळांनी स्वच्छता व कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घ्यावी. कोरोना काळात शिक्षकांनी मुलांच्या शिक्षणासाठी खूप परिश्रम घेतले आहे. पण, आता कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी गुणवत्ता वाढीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.