Solapur News : तलाठी लाच प्रकरणात प्रांत अधिकाय्राची चौकशी

सोलापूर-सांगली या राष्ट्रीय महामार्गात कमलापूर येथील तक्रारदार शेतकऱ्याचा गट क्र. 52 मधून शेतीची पाईपलाईन बाधीत झाली होती.
Investigation provincial authorities in Talathi bribery case solapur crime police
Investigation provincial authorities in Talathi bribery case solapur crime policeesakal
Updated on

मंगळवेढा : राष्ट्रीय महामार्गातील बाधीत पाईपलाईनच्या नुकसान भरपाई काढण्यासाठी 7 हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणात मंगळवेढा विभागाचे प्रांत अधिकारी यांची लाचलुचपत विभागाच्या सोलापूर येथील कार्यालयात चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे याबाबत तपासणी सूत्रांनी याला दुजोरा दिला.

सोलापूर-सांगली या राष्ट्रीय महामार्गात कमलापूर येथील तक्रारदार शेतकऱ्याचा गट क्र. 52 मधून शेतीची पाईपलाईन बाधीत झाली होती. याची नुकसानभरपाई म्हणून 1 लाख 43 हजार 794 इतकी रक्कम मंजूर झाली. बाधीत शेतकऱ्याला भरपाई देण्यासाठी तलाठी सुरज नळे याने खाजगी दलालामार्फत 7 हजार रक्कमेची मागणी केली.

ती रक्कम तलाठ्याने स्वीकारुन चार चाकी वाहनातून पलायन केले. या प्रकरणी दोघांनाही अटक झाली असून तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक यांनी या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग आहे का ? लाचेची रक्कम कुणा कोणाला देत होता. या दृष्टिने कसून चौकशी सुरु केली.

मोबदला देण्यासाठी मोठ्या प्रमाणात टक्केवारीचे प्रकरण गाजत असल्याने पंढरपूरातील संघटना,प्रहार संघटना,व बाळासाहेबाची शिवसेना यांनी आंदोलन केले परंतु या शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या पाठीमागे मोठा राजाश्रय असल्याचे समजून टक्केवारीचे धोरण कायम ठेवल्याने या कार्यालयाची बदनामी होवू लागली.

पण अधिकाय्रांनी डोळेझाक भुमिका घेतली,दरम्यान यातील काही प्रकरणात शेतकऱ्याकडून बाधितांचा भरपाई अदा करण्यासाठी कोरे धनादेश घेतल्याची चर्चा सुरू महसूल कर्मचाऱ्यांनी काही बँक अधिकाऱ्याला देखील हाताशी धरल्याचेही आता समोर येऊ लागले आहे. दरम्यान तपासिक अंमलदाराने प्रांत अधिकारी यांना दि. 3 एप्रिल रोजी दुपारी चौकशीसाठी सोलापूर येथील लाचलुचपत कार्यालयात बोलावून जवळपास साडे तीन तास प्रश्नांचा भडीमार करुन बोलती बंद केल्याची माहिती समोर येत आहे.तपासात बॅक अधिकाय्राना बोलावले जाण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.