Republic Day 2024 : सोलापूरच्या लेकीला मिळणार राष्ट्रपती पदक! तामिळनाडूमध्ये सीबीआय’च्या संयुक्त संचालक

-मूळच्या तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील आयपीएस अधिकारी आणि सध्या चेन्नई येथे ‘सीबीआय’च्या संयुक्त संचालक आणि दक्षिण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या विद्या जयंत कुलकर्णी यांना २५ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
solapur
solapursakal
Updated on

विद्या कुलकर्णींचा सन्मान

-मूळच्या तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील आयपीएस अधिकारी आणि सध्या चेन्नई येथे ‘सीबीआय’च्या संयुक्त संचालक आणि दक्षिण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या विद्या जयंत कुलकर्णी यांना २५ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यापूर्वीही त्यांचा २०१५ मध्येही राष्ट्रपती पदकाने सन्मान झाला आहे.

तमिळनाडू केडरच्या आयपीएस अधिकारी विद्या कुलकर्णी यांचे शिक्षण तिऱ्हे, पंढरपूर, सांगली येथे झाले. १९९८ मध्ये त्यांनी आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन १९९९ पासून देशसेवेला सुरवात केली. सहायक पोलिस अधीक्षक, पोलिस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस महानिरीक्षक, चेन्नई क्राईम ब्रॅंच प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

solapur
Solapur News : संधी असताना राजकारणापासून दूर राहण्याचे काळुंगेचे संकेत

बढतीवर सध्या त्या संयुक्त संचालक आणि दक्षिण विभाग प्रमुख म्हणून ‘सीबीआय’मध्ये चेन्नईत कार्यरत आहेत. कोइमतूर, उटी, नामकल, पुदुकोटई याठिकाणी त्यांनी पोलिस अधीक्षक म्हणून खूप काम केले. कर्तव्यतत्पर, कठोर प्रशासक, कार्यतत्परता या त्रिसूत्रीमुळे या खात्यात त्यांचा नावलौकीक आहे. टाइम मॅनेजमेंट’मध्ये त्यांचा हातखंडा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.