आमदार प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघात शिवसेनेची डरकाळी

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
MLA Praniti shinde and Purushottam Barde
MLA Praniti shinde and Purushottam Bardeesakal
Updated on
Summary

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

सोलापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आयत्यावेळी पक्षात आलेल्यांना नव्हे तर ज्यांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली, तग धरुन आहे अशा निष्ठावंत शिवसैनिकांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (Purushottam Barde) यांनी दिली. कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti shinde) यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी या मतदारसंघातून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

MLA Praniti shinde and Purushottam Barde
आमदार प्रणिती शिंदें म्हणाल्या... प्लीज सगळं थांबवा आता.. 

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काल (शनिवारी) महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शनिवारी पार पडली. त्यावेळी जिल्हाप्रमुख बरडे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत महापालिकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या यंत्रणेबाबत, पदाधिकाऱ्यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकांनाच महापालिका निवडणुकीतत उमेदवारी देऊ, आयात उमेदवारांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली नाही, असे बरडे यांनी ठणकावून सांगितले.

MLA Praniti shinde and Purushottam Barde
Solapur : आमदार प्रणिती शिंदेंच्या मनात आहे तरी काय?

पक्षाने पदाच्या स्वरुपात दिलेली जबाबदारी सर्वांनी प्रामाणिकपणे पार पाडायला हवी. पक्षबांधणी मजबूत करुन या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जास्तीतजास्त नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर, नगरसेवक भारतसिंग बडुरवाले, निरंजन बोध्दूल, उपशहरप्रमुख धनराज जाधव, रविकांत कांबळे, रेवण बुक्कानुरे, चंद्रकांत मानवी, धनराज जानकर, अनिल दंडगुले, प्रशांत कदम, अंबादास चव्हाण, बालाजी विठ्ठलकर, दशरथ पाथरुट, रविकांत गायकवाड, सुशील कन्नुरे, राज पांढरे आदींसह शिवसेनेचे शहरमध्य मधील पदाधिकारी उपस्थित होते.

MLA Praniti shinde and Purushottam Barde
आमदार प्रणिती शिंदेंविरोधात गुन्हा! "हे' आहे खरे कारण

महापालिकेत स्वतंत्र की महाविकास आघाडी?

सोलापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही, हे अजूनही अस्पष्टच आहे. कॉंग्रेसने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला असून समाधानकारक प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही स्पष्ट केले आहे. परंतु, शिवसेना, राष्ट्रवादी असो वा कॉंग्रेसला जेव्हा जेव्हा स्वबळावर निवडणुका झाल्या, त्यावेळी महापालिका निवडणुकीत 102 उमेदवार देता आलेले नाहीत, असे बोलले जात आहे. आता नवीन आराखड्यानुसार नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे तगडे उमेदवार देऊन त्यांना विजयी करताना सर्वांचाच कस लागणार आहे. तरीही, अद्याप शिवसेनेने स्वबळावर लढणार की महाविकास आघाडी करून महापालिका निवडणूक लढणार हे स्पष्ट केलेले नाही. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानंतर निर्णय होईल, असे शिवसेनेचे पदाधिकारी सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.