रेल्वे
रेल्वे sakal

करमाळा येथील एका रेल्वे ट्रॅक वरील रेल्वेचे दोन्ही इंजिन व दोन डबे घसरले

वेळ एक रेल्वे ट्रॅक बंद होता त्यामुळे ठराविक गाड्यांच्या वेळेत बदल झाला होता.
Published on

करमाळा : येथील एका रेल्वे ट्रॅक वरील रेल्वेचे दोन्ही इंजिन व दोन डबे रेल्वे ट्रॅक सोडून अचानक घसरले, त्यामुळे काहीवेळ रेल्वेलाईन बंद होती. रेल्वे अचानक घसरल्याने रेल्वेचे दोन्ही इंजिन थेट केम येथील शेतकरी रवी खाणट यांच्या शेतात गेली. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसून रेल्वेरुळाचे मात्र नुकसान झाले.

सोलापूर- पुणे हा दुहेरी रेल्वे ट्रॅक असून या ट्रॅक वरील एका ट्रॅकवरुन जाणारी रेल्वे काल (ता. ३) रात्री केम जवळ घसरली व खाली गेली, परंतु रेल्वे विभागाने आज पहाटे ३ वाजता तातडीने यंत्रणा सज्ज करून क्रेनद्वारे हे रेल्वेचे दोन्ही इंजिन पुन्हा रेल्वे ट्रॅकवर लावून पूर्ववत करण्याचे काम चालू आहे.यासाठी 3 ते 4 दिवस लागू शकतात.परंतु काही वेळ एक रेल्वे ट्रॅक बंद होता त्यामुळे ठराविक गाड्यांच्या वेळेत बदल झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.