आबासाहेबांना मरणोत्तर कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

आबासाहेबांना मरणोत्तर पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
आबासाहेबांना मरणोत्तर पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
आबासाहेबांना मरणोत्तर पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीरCanva
Updated on
Summary

या पुरस्काराची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केली. दोन लाख 50 हजार रुपये, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सांगोला (सोलापूर) : रयत शिक्षण संस्थेचे (Rayat Shikshan Sanstha) कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील (Karmaveer Dr. Bhaurao Patil) यांच्या जयंतीनिमित्त 2020-21 चा 'पद्मभूषण, कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार' शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. दोन लाख 50 हजार रुपये, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आबासाहेबांना मरणोत्तर पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
भाजप, एमआयएम व मनसेच्या विरोधात सर्व पक्ष एक व्हा : आडम मास्तर

पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करताना रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोरगरीब जनतेच्या न्याय्य हक्कासाठी गणपतराव देशमुख यांनी अतोनात प्रयत्न केले आहेत. हा पुरस्कार देताना मला मनस्वी आनंद होत आहे. या पुरस्कारासाठी ज्या व्यक्तीची निवड केली सुदैवाने ती आपल्या हयातीत नाही; परंतु त्यांनी कर्मवीर अण्णांच्या विचाराला सतत पाठिंबा दिला आहे. विधिमंडळामध्ये 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. 1978 ते 80 या काळात पुलोद सरकारमध्ये कृषी आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. 1999 ते 2002 मध्ये रोजगार हमीच्या खात्यामध्ये महाराष्ट्र शासनाची त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून गणपतरावांना तीन वेळा संधी मिळाली. 1982 सालापासून ते रयत शिक्षण लॉजिस्ट सभासद होते. 2017 सालापासून संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. अशा आयुष्यभर गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी त्यांनी काम केले. अशा योग्य व्यक्तीची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

आबासाहेबांना मरणोत्तर पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
दूध संघात माढा, करमाळा, सांगोला किंगमेकर! तयारी निवडणुकीची

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आबांना कर्मवीर अण्णांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. कर्मवीर अण्णांसारखेच आबांनीही संपूर्ण आयुष्यभर कष्टकरी, कामगार, गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी झटत राहिले. त्यांच्या या कामामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे.

- बाबासाहेब देशमुख, गणपतराव देशमुखांचे नातू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()