दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.
पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने (Kartiki Yatra) ४ ते २० नोव्हेंबरदरम्यान विठ्ठल रुक्मिणीचे (Vitthal Rukmini Temple) चोवीस तास दर्शन सुरू राहणार आहे. कार्तिकी यात्रेची मंदिर समितीकडून संपूर्ण तयारी झाली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (Gahininath Maharaj Ausekar) यांनी दिली आहे.