कार्तिक यात्रेनिमित्ताने (Kartiki Yatra) मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा (Vitthal-Rukmini Mahapuja) पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar) यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून उदगीर येथील विठ्ठल भक्त बाबासाहेब सगर यांना महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला.