Solapur Cyber Crime : पासवर्ड स्ट्राँग ठेवा, अन्यथा तुमचा मोबाईल होईल हॅक

सायबर पोलिसांचे आवाहन; अज्ञान, मोह अन् घाई टाळून मेसेज्‌, कॉलची करावी खात्री
Keep password strong otherwise your mobile will hacked Cyber Police
Keep password strong otherwise your mobile will hacked Cyber PoliceSakal
Updated on

सोलापूर : शहरातील १७ वर्षीय मुलाचा मोबाईल हॅक करून कोणीतरी त्याच्या मोबाईलवरून मुलीला चॅटिंग केले. धार्मिक भावना दुखावतील असे मेसेज्‌ असल्याने पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ठाण्यात आणले. शेवटपर्यंत तो मुलगा म्हणाला मी तसे केलेच नाही.

शेवटी पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेतली आणि त्याचा मोबाईल हॅक करून तिसऱ्याच व्यक्तीने ते मेसेज्‌ केल्याचा उलगडा झाला. त्यामुळे प्रत्येकांनी मोबाईलचा पासवर्ड स्ट्राँग ठेवावा व नियमित बदलावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, ई-मेल अशा बाबींसाठी प्रत्येकजण विशिष्ट पासवर्ड ठेवतात. मोबाइलमध्ये ‘एटीएम’चा पिन नंबर, बॅंकेचा खाते क्रमांक देखील काहीजण साठवून ठेवतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे सावज होण्यापूर्वी प्रत्येकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

लहान मुले मोबाईलमधील फ्री ॲपवरून गेम खेळतात. त्यांच्याकडूनही काहीतरी चूक झाल्यास मोबाईल हॅक होवू शकतो. त्यामुळे मोबाईल धारकांनी पिन, पासवर्ड बदलावा. तसेच अनोळखी विशेषतः मोफत ॲप डाऊनलोड करू नयेत.

मोबाईल हॅक करून सायबर गुन्हेगार आपल्या मोबाईलमधील संपर्क क्रमांक, फोटोसह इतर माहितीचा गैरवापर करू शकतात. आता सण-उत्सव काळात अनेक प्रकारच्या ऑफर्स देऊन सायबर गुन्हेगार लोकांना फसवू शकतात. त्यामुळे घाई, अज्ञान व मोह या तीन गोष्टी टाळाव्यात, जेणेकरून फसवणूक होणार नाही, असेही आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मेसेज्‌ किंवा ॲपची स्पेलिंग नीट पाहा

‘महावितरण’च्या नावाने बनावट मेसेज तयार करून आजच बिल भरा, नाहीतर तुमची लाइट कापली जाईल, असा मेसेज पाठविला जातो. त्यावेळी ‘महावितरण’च्या अधिकृत संकेतस्थळाच्या नावात थोडासा बदल करून सायबर गुन्हेगार ग्राहकांची फसवणूक करतात.

मोबाईल ॲपच्या बाबतीतही तसाच फेरफार केला जातो. त्यामुळे प्रत्येकांनी तो मेसेज व ॲप खात्रीशीर आहे की नाही याची पडताळणी करावी, घाई करू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

जन्मतारीख, गाडी नंबर, मोबाईल क्रमांक हा सर्रासपणे अनेकजण पासवर्ड ठेवतात. सायबर गुन्हेगार हेच हेरतात आणि समोरच्याला आमिषाच्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे पासवर्ड हा स्ट्राँग असावा, ज्यात अक्षर, साईन व अंक देखील असावेत. काही दिवसांनी तो सतत बदलावा, जेणेकरून फसवणूक होणार नाही.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.