Solapur : जागा वनविभागाच्या मालकीची, कर आम्ही कसा द्यायचा? सोलापूर महापालिकेचे स्पष्टीकरण

Solapur latest News | पाकणी ग्रामपंचायतीच्या ठरावाचा तिढा जिल्हाधिकारी सोडविणार
land owned by forest department how should we pay tax Solapur Municipal Corporation
land owned by forest department how should we pay tax Solapur Municipal Corporationsakal
Updated on

सोलापूर : वनविभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील (एनएचएआय) वादामुळे समांतर जलवाहिनीचे काम पाकणी, हिवरे, चिखली परिसरात थांबले आहे. या ग्रामपंचायतींचे ठराव विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मिळाल्यास त्याद्वारे वनविभागाच्या पर्यायी जागेतून जलवाहिनी नेता येणार आहे.

मात्र, पाकणी ग्रामपंचायतीने थकीत ६३ लाखांचा कर मागितल्याने कोंडीत सापडलेल्या महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्राची जागा वनविभागाच्या मालकीची असल्याने कर आम्ही कसे भरणार, असा प्रतिप्रश्न केला आहे. आता हा विषय पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आला असून जिल्हाधिकारी त्यावर तोडगा काढतील, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.

सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम आता १०४ किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत कामाची मुदत असून मुदतीत पाइपलाइनचे काम पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका अधिकाऱ्यांचे आहे. स्मार्ट सिटीतून मंजूर झालेली समांतर जलवाहिनी चार वर्षांपासून सतत चर्चेत आहे.

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली १३ महिन्यांत जवळपास ९३ किमी काम पूर्ण झाले असून आता केवळ पाच किमी अंतरावर विविध ठिकाणी जलवाहिनी टाकायला अडचणी आहेत. त्यात टेंभुर्णी बायपास, उजनी धरणाजवळ आणि चिखली, हिवरे, पाकणी या ठिकाणांचा समावेश आहे.

टेंभुर्णी बायपासजवळील बाधित शेतकऱ्यांची मोजणी पूर्ण झाल्यावर त्यांना मोबदलादेखील दिला जाणार आहे. पण, वन विभागाच्या जागेचा तिढा सुटणे गरजेचे असल्याने सध्या महापालिका आयुक्तांचा त्यावर सर्वाधिक फोकस आहे. ठरावासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांच्यासमवेतही चर्चा केली आहे.

महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाकणी येथील वन विभागाच्या जागेत सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र (एसटीपी) उभारले आहे. अंदाजे ४० वर्षांत त्या जागेची अजूनपर्यंत महापालिकेला मालकी मिळालेली नाही.

महापालिकेचा त्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यातच आता पाकणी ग्रामपंचायतीने महापालिकेला ठराव देण्यापूर्वी आमची पूर्वीची प्रलंबित कराची थकबाकी देण्याची मागणी केली आहे. मात्र, ती जागा वन विभागाच्याच मालकीची असल्याने महापालिकेला टॅक्स देताच येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण करून सोलापूरकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांचे प्रयत्न आहेत. तिन्ही ग्रामपंचायतींचे ठराव प्राप्त झाल्यानंतर काम वेगाने होणार आहे. काहीतरी कारण सांगून जनहिताच्या कामाची अडवणूक कोणालाही करता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंदर्भात अधिकार आहेत.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.