ताईच्या मंत्रिपदाला कोणाचाही अडथळा येऊ नये म्हनूनशान सायबांनी अक्कलकोट इधानसभा मतदारसंघात अण्णाला पाडल्याचा दृष्टांत सरांना आताच कसा झाला?
ताईच्या मंत्रिपदाला कोणाचाही अडथळा येऊ नये म्हनूनशान सायबांनी अक्कलकोट (Akkalkot, District Solapur) इधानसभा मतदारसंघात अण्णाला पाडल्याचा दृष्टांत सरांना आताच कसा झाला? हे कुणालाबी कळंनासं झालंय... तसं तर ही फार जुनी गोष्ट हाय म्हना... कारण तवा शेगावच्या गोळीबारामुळं अक्कलकोट इधानसभा अन् राज्यमंत्री असलेलं अण्णा लईच चर्चेत आलं व्हतं... गोळीबाराशी अण्णाचा कायबी संबंध नसताना अण्णाला गुतवलं हुतं असं सांगत्यात...
2009 ची गोष्ट हाय ती... सोलापूर जिल्ह्यात सांगोल्याच्या दादानं घडवून आणलेला गोळीबार, करमाळ्यात बागल नामक एका कार्यकर्त्यावर झालेला गोळीबार अन् राज्यमंत्री असलेल्या अण्णाच्या मतदारसंघातील शेगावमधी झालेल्या गोळीबाराच्या तीन घटनांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला हुता... सर्वच गोळीबाराबाबत नंतर खुलासे झाले अन् तोंडात बोटं घालायचीच येळ आली. या निवडणुकीत अक्कलकोट मतदारसंघात वातावरण तापलं हुतं...
गोळीबाराच्या परकरणात आपल्याला अटक हुईल म्हनूनशान अण्णा फरार हुतं... सायबाची येक सभा अक्कलकोटला झाली तर अण्णा निवडून येत्यात अशी त्येंच्या कार्यकर्त्यांची लईच इच्छा ! पण सायबाला अण्णाबरुबर अप्पाबी जवळचाच. त्येत सायब आपल्या इज्जतीला लईच घाबरत्यात... आपल्या अंगावर कायबी येऊने म्हनूनशान अक्कलकोटला जायचं टाळत हुते... दुधनीच्या मोठ्या सायबावर अन् शंकरमालकावर निवडणुकीचा संपूर्ण भार पडला हुता... एक अण्णा परचारासाठी मतदारसंघात नसल्यानं वंगाळच झालं हुतं... लईच ईनवण्या झाल्यानंतर सायब कुंभारीत सभा घ्यायला तयार झाले अन् सभा झाली... भायर राहूनबी अण्णानं मतदारसंघ हादरवून सोडल्याचं मतमोजणीनंतर समजलं... इतकं सगळं रामायण हुनबी अण्णा फकस्त एक हजार 185 मतांनी पडलं हुतं... तवा अप्पा लईच टेन्शनमधी आलतं...
या काळातलं रेफरन्स घेत सर आता बाण हाणू लागल्याती... इतकं दिवस काय झालतं सर? हा कार्यकर्त्यांचा प्रश्न... सरबी अडचणीत हुतं... आता एकतर भाजपमधी गेल्यानं अन् कसलीबी जबाबदारी नसल्यानं मोकळं रान असल्यासारखं वाटालालंय म्हनूनशान सर हाण हाणू लागल्याती... हे बी इरोधकांचं म्हणणं... सायब काय करत्यात हे कधीच कुणाला समजत नाय... मध्य मतदारसंघातून ताई निवडून येण्यामागची कारणं शोधली तर सगळं इंगीत समजंल... सर तुमी म्हंता तसं दक्षिणमधी कोण, शहर उत्तरमधी कोण अन् मध्यमधी बंडाळी कोण करणार हे सायबास्नी आधीच ठाव असतं, हे सगळं "झाकली मूठ...' असतीया... पन आता हे सगळं भायर काढण्याचं कारण आमाला तर माहिताय ! सर... ये बात कुछ हजम नही हुई !
- थोरले आबासाहेब
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.