राष्ट्रवादीकडे मामा पण कॉंग्रेसकडे साहेब अन्‌ ताई!

राष्ट्रवादीकडे मामा पण कॉंग्रेसकडे साहेब अन्‌ ताई ! पक्षांतर केलेल्यांकडे "बीओटी'वर दिला राष्ट्रवादी पक्ष
राष्ट्रवादीकडे मामा पण कॉंग्रेसकडे साहेब अन्‌ ताई !
राष्ट्रवादीकडे मामा पण कॉंग्रेसकडे साहेब अन्‌ ताई !Canva
Updated on
Summary

महापालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक आता तोंडावर असतानाच राज्यातील महाविकास आघाडीतील मतभेद पाहून स्थानिक पदाधिकारी एकमेकांवर टीका करू लागले आहेत.

सोलापूर : महापालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक (Election) आता तोंडावर असतानाच राज्यातील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मतभेद पाहून स्थानिक पदाधिकारी एकमेकांवर टीका करू लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून सोलापूर (Solapur) शहरात अन्य पक्षांतून आलेल्यांकडे स्वत:चा पक्ष 'बीओटी'वर (BOT) दिला आहे, असा आरोप कॉंग्रेस (Congress) व शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित येण्याची शक्‍यता आता धुसर झाली आहे.

राष्ट्रवादीकडे मामा पण कॉंग्रेसकडे साहेब अन्‌ ताई !
धवलदादा... हे बी आव्हान हाय बरं का !

सोलापूर महापालिकेत नेहमी दुसऱ्या क्रमांकावर राहणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या (बसप) बरोबरीला आला. महापालिकेत सध्या राष्ट्रवादीचे केवळ चार नगरसेवक असून जिल्हा परिषदेतही 20 पेक्षा कमी सदस्य आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांविरुद्ध लढल्याने भाजपचे सर्वाधिक सरपंच झाले, अशीही त्यावेळी चर्चा झाली. मात्र, आता महापालिका व झेडपी निवडणुकीत तिन्ही पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी घ्यावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून शिवसेनेने अजूनही भूमिका जाहीरपणे स्पष्ट केलेली नाही. तरीही, वरिष्ठांनी जिल्हाप्रमुखांना स्वबळाची तयारी ठेवा, असे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी असून सतत ते एकमेकांवर टीका करीत आहेत. तिन्ही पक्षांतील पदाधिकारी एकमेकांच्या पक्षात विशेषत: राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वबळावर लढतील, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

राष्ट्रवादीकडे मामा, पण आमच्याकडे साहेब अन्‌ ताई

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून एमआयएमचे तौफिक शेख, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यांनी पक्षांतर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला असून, काही दिवसांपूर्वी त्यांनी या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व आमदार संजय शिंदे (मामा) असले, तरी आमच्याकडे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (साहेब) व आमदार प्रणिती शिंदे (ताई) आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस हाच सर्वांत मोठा पक्ष राहील. अपक्ष असतानाही राष्ट्रवादीचे काम करणारे संजय शिंदे शहरात आले, तरीही आम्हाला काहीच फरक पडणार नाही. भाजप व राष्ट्रवादीला लोक वैतागल्याचा आरोप शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केला आहे.

राष्ट्रवादीकडे मामा पण कॉंग्रेसकडे साहेब अन्‌ ताई !
विधानपरिषद निवडणुकीचा अंदाज येईना अन्‌ रणनीतीही ठरेना!

...तर भाजपला होईल सर्वाधिक फायदा

राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, महाविकास आघाडीच्या दुर्लक्षामुळेच ते रद्द झाल्याचा प्रचार व प्रसार भाजपकडून सुरू आहे. मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर तरुणांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित राहिल्याने सरकारबद्दल नाराजी आहे. शेतीमालाचे दर घसरले असून बेरोजगारीही वाढली आहे. कोरोनात अनेक घटकांना राज्य सरकारकडून ठोस मदत मिळालेली नाही, त्याचेही भाजपने भांडवल केले. आता शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरूनही भाजपने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. या सर्व बाबींचा विचार करून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यास त्याचा सर्वाधिक फायदा भाजपलाच होईल, असा अंदाज वरिष्ठ नेत्यांनी वर्तविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()