मंगळवेढा - जिल्हा परिषदेच्या नवीन आरक्षण सोडती नुसार जि.प. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा भोसे गटाचे आरक्षण सुरक्षित राहिले तर इतर गटाचे आरक्षण बदलल्यामुळे इतर विद्यमान सदस्यांना विश्रांती तर काहींना गट बदलावा लागणार आहे.
चार सदस्य असलेल्या जिल्हा परिषद गटात नव्या प्रभाग रचनेनुसार एका गटाची वाढ झाली त्यामुळे विद्यमान सदस्य नितीन नकाते यांचा बोराळे गट असलेला नव्याने दामाजी नगर या नावाने झाला.हा गट राखीव महिलेसाठी आरक्षित झाला. त्यांना नव्या आरक्षणाचा फटका बसला हुलजंती जि.प.गट हा इतर मागासवर्गीयासाठी आरक्षित झाला.नव्या आरक्षण सोडते नुसार हुलजंती जिल्हा परिषद गटातील मरवडे व हुलजंती पं. समिती गणाचे आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे या दोन्ही पंचायत समिती सदस्याचा भार जि प सदस्यांना सोसावा लागणार आहे.
या गटातून तयारी करणारे हनुमंत उद्योगपती हनुमंत दुधाळ यांना फायदेशीर ठरला.तर विद्यमान सदस्या शिला शिवशरण यांना दुसरा गट शोधावा लागणार आहे.चोखामेळा नगर या गटाचे आरक्षण राखीव महिलेसाठी आरक्षित झाले. त्यामुळे या ठिकाणी नवीन चेहरा शोधावा लागणार आहे तर नंदेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये महिलेसाठी खुला राहिल्यामुळे याही गटात नवीन महिला चेहरा शोधावी लागणार आहे. विद्यमान सदस्या मंजुळा कोळेकर यांचे पाठखळ हे गाव चोखामेळानगर या जिल्हा परिषदे गटामध्ये समाविष्ट झाले असले तरी या गटाचे आरक्षण राखीव महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना देखील थांबावे लागणार आहे समाज कल्याण माजी सभापती शीला शिवशरण यांनी पहिल्या अडीच वर्षांमध्ये लोकाभिमुख काम केल्यामुळे त्यांना चोखामेळा नगर व दामाजी नगरचा पर्याय उपलब्ध आहे.
उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा भोसे जि.प. गट हा सर्वसाधारण राहिल्यामुळे त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी आहे मात्र गत निवडणुकीत मागील दामाजी कारखान्याच्या निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी पाडापाडीचे राजकारण झाले त्यामुळे हा गट राष्ट्रवादीला गमवावा लागला. मात्र या गटावर राष्ट्रवादीची पकड मात्र कायम राहिली आहे त्यामुळे यंदा मात्र पाडापाडीच्या राजकारणाची शक्यता कमी राहणार असल्यामुळे त्यामुळे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासाठी हा गट देखील कडवे आव्हान ठरणार आहे परंतु राष्ट्रवादी मधून कोणता चेहरा समोर येणार यावर देखील बरेच अवलंबून अवलंबून असले तरी ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा नवीन ताकदवान चेहरा देखील पुढे येऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.