Lek ladki yojana : लेक लाडकी योजना कागदावरच; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कमी प्रतिसाद, लाभार्थ्यांमध्ये जागृती गरजेची

महाराष्ट्र् शासनाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला
lek ladki yojana anganwadi workers protest girls education mortality rate awareness
lek ladki yojana anganwadi workers protest girls education mortality rate awarenessSakal
Updated on

सोलापूर : मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देऊन मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, बालमृत्यूचे प्रमाण रोखणे, मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, बालविवाह रोखणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य करणे इत्यादी बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2023 पासून राज्यात लेक लाडकी ही योजना सुरू केली.

पण 9 महिने उलटून गेले तरी जिल्ह्यातून अजून एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही.त्यामुळे राज्य शासनाची लेक लाडकी योजना ही फक्त घेषणेपूर्तीच मर्यादित राहिली असल्याचे सोलापूर जिल्ह्यात चित्र आहे.

महाराष्ट्र् शासनाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी लेक लाडकी योजनेची घोषणा केली.

ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, राज्यातील कोणत्याही गरीब कुटुंबाला महाराष्ट्र राज्य सरकार आर्थिक मदत करेल. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलीला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल.

ही आर्थिक मदत मुलगी 18 वर्ष होईपर्यंत सरकारकडून तिला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शिक्षणासाठी दिली जाईल.त्यामुळे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा फटका

ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका खूप महत्वाची आहे.अंगणवाडी मदतनीस व सेवीकांनी ग्रामीण तसेच शहरी भागात राहणाऱ्या पात्र कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्याकडून ऑफलाईन पध्द्तीने फॉर्म भरून घेणे. या योजनेबाबत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहचवणे.पण गेल्या महिनाभरापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने या योजनेचे काम ठप्प आहे.

अशी मिळणार मदत

सदर योजनेअंतर्गत जे पिवळे / केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत त्यांच्या कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर तिला ₹5000, इयत्ता पहिली 6000 /- रुपये, सहावी 7000 /-रुपये , अकरावी 8000 /- रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये प्रमाणे एकूण रुपये 1,01,000 /- एवढी रक्कम देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.