ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत ! वनविभागाच्या सापळ्यालाही चकवा

ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत ! वनविभागाच्या सापळ्यालाही चकवा
ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत ! वनविभागाच्या सापळ्यालाही चकवा
ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत ! वनविभागाच्या सापळ्यालाही चकवाCanva
Updated on
Summary

शिरापूर व खुनेश्‍वर परिसरात वनविभागाने लावलेल्या सापळ्याला बिबट्या चकवा देत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

वाळूज (सोलापूर) : सीना-भोगावती-नागझरी नद्यांच्या (Seena, Bhogawati and Nagzari rivers) ऊसपट्ट्यात बिबट्याची (Leopard) दहशत निर्माण झाली असून, शिरापूर (Shirapur) व खुनेश्‍वर (Khuneshwar) परिसरात वनविभागाने लावलेल्या सापळ्याला (Trap) बिबट्या चकवा देत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मोहोळ (Mohol) तालुक्‍यातून सीना, भोगावती व नागझरी या प्रमुख तीन नद्या वाहतात. सीना नदीतून उजनी धरणाचे (Ujani Dam) पाणी नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठी सोडण्यात येते. तालुक्‍यातून उजनीचा डावा कालवा गेल्याने उसाचे (Sugarcane) क्षेत्र मुबलक आहे. वनांचे घटते प्रमाण लक्षात घेता त्यांचा अधिवास धोक्‍यात आल्याने बिबट्या, गवा, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांनी ऊस पट्ट्यात आश्रय घेतल्याचे आढळून येत आहे.

ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत ! वनविभागाच्या सापळ्यालाही चकवा
अक्‍कलकोट कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर! करमाळा, माढ्यातील रुग्ण घटले

गेल्या दीड- दोन वर्षात मोहोळ तालुक्‍यासह आसपासच्या तालुक्‍यांतही बिबट्याचे अनेकदा दर्शन झाले आहे. मोहोळ, मोहोळ स्टेशन व घाटणे परिसरात गेल्या वर्षी बिबट्या आढळला होता. आता पुन्हा मोहोळ तालुक्‍यातील शिरापूर (सो), खुनेश्वर व मोरवंची गावाच्या शिवारात बिबट्या आढळला असल्याने सावधगिरी बाळगण्याबाबत मोहोळ येथील वन विभागाच्या कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. मोहोळ तालुक्‍यातील शिरापूर, खुनेश्वर व मोरवंची परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत.

ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत ! वनविभागाच्या सापळ्यालाही चकवा
तुकडेबंदीच्या निर्बंधातून भ्रष्टाचाराला खतपाणी

वनविभागाकडून नागरिकांना आवाहन

त्यामुळे गावातील नागरिकांनी रात्री- अपरात्री एकट्याने घराबाहेर पडू नये, हातात बॅटरी घ्यावी, फटाके वाजवावेत, एखाद्या रिकाम्या डब्याचा किंवा थाळीचा मोठ्याने आवाज करावा, लहान मुलांना एकटे सोडू नये, शाळेत ने-आण करण्यासाठी पालकांनी स्वतः काळजी घ्यावी, रात्री- अपरात्रीची कामे करताना एखाद्या वाद्याचा, वस्तूचा आवाज करत राहावे. रस्त्याने जाताना आवाज करत, बोलत जावे, रस्त्यावर अपरात्री एकट्याने बसू अगर फिरू नये, रात्री- अपरात्री बाहेर शौचास जाऊ नये, शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांना कुंपणामध्ये बांधावे, घराच्या सभोवताली रात्री प्रकाश असावा तसेच वनविभागामार्फत देण्यात आलेल्या चित्रफिती सर्व ग्रामस्थांना व्हॉट्‌सऍपद्वारे प्रसारीत करावी व त्याप्रमाणे दक्षता घ्यावी, वरीलप्रमाणे आपापल्या गावाच्या परिसरात सर्वांना काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त माहिती देऊन प्रचार व प्रसिद्धी करावी, अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा पसरवू नयेत. वन विभागास सहकार्य करावे, अशी विनंती मोहोळच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत. बिबट्यासदृश किंवा वन्यप्राणी आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधावा.

- सचिन कांबळे, वनरक्षक, मोहोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.