होटगी रोडवरील विमानसेवा सुरळीत होण्यासाठी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी प्रमुख अडथळा आहे.
सोलापूर : होटगी रोडवरील विमानसेवा सुरळीत होण्यासाठी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची (Shri Siddheshwar Sugar Factory) चिमणी प्रमुख अडथळा आहे. चिमणी पाडकामाची प्रक्रिया महापालिकेने (Solapur Municipal Corporation) अंतिम टप्प्यावर आणून ठेवली आहे. परंतु, विधी व न्याय विभागाच्या (Department of Law and Justice) अभिप्रायाशिवाय काहीच कार्यवाही करता येणार नाही. त्यामुळे महापालिकेने आता विधी व न्याय विभागाला पत्र लिहून अभिप्राय मागविला आहे. (Letter given by Municipal Corporation to Law and Justice Department regarding demolition of chimney of Siddheshwar Sugar Factory-ssd73)
मुंबई (Mumbai), पुण्यानंतर (Pune) सोलापूर (Soapur) शहर- जिल्ह्यात उद्योगवाढीला मोठा वाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, रोजगाराअभावी अनेकांनी पुणे, मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतर केले आहे. अनेकांनी सोलापूरसाठी विमानतळाची (Solapur Airport) गरज असल्याचे मत नोंदविले आहे. दुसरीकडे, सोलापूरमध्ये नव्याने उद्योग सुरू करण्यास अथवा उद्योग वाढविण्यास इच्छुक असलेल्यांनीही विमानतळाची गरज व्यक्त केली आहे. बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ प्रस्तावित आहे. परंतु, त्यासाठी खूप कालावधी जावा लागणार आहे. तत्पूर्वी, होटगी रोडवरील विमानसेवा सुरळीत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जात आहे. महापालिका आयुक्त आता चिमणी पाडकामावर ठाम असून विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार पुढील कार्यवाही होईल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विमानतळ विकास प्राधिकरण अन् महापालिकेचे म्हणणे वेगवेगळे
महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची 90 मीटरची चिमणी विमानतळास प्रमुख अडथळा आहे. उर्वरित अडथळे काही दिवसांत हटविले जाऊ शकतात, परंतु चिमणी प्राधान्याने काढायला अथवा चिमणीची उंची कमी करायला हवी. दुसरीकडे, चिमणीचे बांधकाम करताना त्यांनी महापालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे चिमणी पूर्णपणे अनधिकृत असल्याने ती पूर्णपणे पाडली जाईल, असे महापलिकेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेकडून चिमणी काढून विमानतळाचा अडथळा दूर करण्याची कार्यवाही होईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
चिमणी पाडकामासाठी 1.17 कोटींचा मक्ता
श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकामासाठी आता एक कोटी 17 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तत्पूर्वी, नाशिक येथील मक्तेदाराला तेच काम 43 लाखाला दिले होते. परंतु, आता त्याची रक्कम वाढली असून बंगळूर येथील बल्लारी या ठिकाणच्या मक्तेदाराने हे काम घेतले आहे. दरम्यान, ही रक्कम कारखान्याकडून वसूल केली जाईल, अशी माहिती नगररचना विभागाचे सहसंचालक लक्ष्मण चलवादी यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.