लॉकडाउनमुळे केळीचे दर कोसळले; तरीही एकरात 4 लाखांचे उत्पन्न 

Lockdown caused banana prices to fall Still an income of Rs 4 lakh per acre
Lockdown caused banana prices to fall Still an income of Rs 4 lakh per acre
Updated on

करमाळा (जि. सोलापूर) : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. खरबूज, कलिंगड फेकून द्यावे लागत आहेत तर केळी अक्षरशः जनावरांना टाकावी लागली. तर काही शेतकऱ्यांनी दोन रूपये, तीन रूपये किलो दराने केळी विकली आहे. मात्र जेऊरवाडी (ता. करमाळा) येथील सचिन निमगिरे यांनी खचून न जाता गावोगावी फिरून स्वतःच केळी विकण्याचा निर्णय घेतला. यातून ते दररोज पाच ते सहा गावात फिरून 25 ते 30 रूपये डझन दराने केळी विकत आहेत. यातून त्यांनी एक एकरातील केळीचे 4 लाख रूपये उत्पन्न घेतले आहे. 

लॉकडाउन वाढतच गेल्याने शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. कांदा, कलिंगड, खरबूज, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाही. परदेशात व परराज्य जाणारी केळी लॉकडाउनमुळे जाऊ शकत नाही. परिणामी केळीचे बाजार पूर्णपणे कोसळले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आले. मात्र, सचिन निमगिरे यांनी स्वतः फिरून केळी विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे जी केळी दोन रूपये किलो दराने विकावी लागली असती किंवा फेकून द्यावी लागली असती, त्याच केळीचे त्यांना चार लाख रूपये उत्पन्न मिळाले आहे. निमगिरे यांनी मागील महिन्यात आपल्या शेतातील द्राक्षे देखील गावोगावी फिरून विकली होती. केळी विकण्यासाठी जयपाल कसबे, पप्पु चुनाडे हे त्यांना मदत करत आहेत. एका पिकअपमध्ये दररोज 40 कॅरेट केळी विक्रीसाठी आणली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.