Lok Sabha Poll 2024 : काँग्रेसची यादी जाहीर; सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी, भाजपचा उमेदवार कोण?

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध भाजपचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Lok Sabha Poll 2024
Lok Sabha Poll 2024 Sakal
Updated on

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने गुरुवारी (ता. २१) रात्री ५१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात आमदार शिंदे यांचा समावेश आहे. आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध भाजपचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होणार आहे. १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून १९ पर्यंत त्यासाठी मुदत आहे.

२२ एप्रिल ते ५ मे या काळात उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळणार आहे. दोन्ही मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, काँग्रेसने सोलापूरचा उमेदवार जाहीर करून भाजपसमोर तरुण चेहऱ्याचे आव्हान उभे केले आहे.

शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. विशेष म्हणजे २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत त्यांनी मोदी लाटेतही प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव केला. माजी केंद्रीय गृहमंत्री

सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय निवृत्ती घेतल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांना देशाच्या राजकारणात संधी मिळेल, असा सर्वांनाच विश्वास होता. त्यानुसार आता काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत आमदार प्रणिती शिंदेंचे नाव आले आहे.

गावभेट दौऱ्यातून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण

आमदार प्रणिती शिंदे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात चांगल्याच ॲक्टिव्ह झाल्या आहेत. त्यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रणिती शिंदे यांनी मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर या तालुक्यांमध्ये दौरे करून छोट्या छोट्या सभा घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून रोजगार, सिंचनाचे प्रश्न, दुष्काळी मदत, महागाई आदी मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे.

काँग्रेसचा तरुण अन्आक्रमक चेहरा

सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी केवळ सोलापूर शहर मध्य या एकाच मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या विरोधी पक्षाच्या आमदार आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यापासून केंद्र सरकारच्या धोरणावर त्यांनी वारंवार सडकून टीका केली आहे.

एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (शिंदे गट) या पक्षांच्या नेत्यांवरही त्यांनी आक्रमकपणे हल्लाबोल केला आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार शिंदे यांनी मतदारसंघासह राज्यातील विविध प्रश्‍नांवर सातत्याने आक्रमक भूमिका मांडलेली आहे.

अधिवेशनात अनेक चर्चांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. अशा तरुण चेहऱ्याला काँग्रेसने संधी दिली आहे. त्यामुळे सोलापूर मतदारसंघातील यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे निश्‍चित.

जिथे वडिलांचा पराभव, तिथेच विजयाची तयारी

लोकसभेचे तत्कालीन सभागृहनेते केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाला. त्याच सोलापूर लोकसभा मतदारसंघात वडिलांच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे या मैदानात उतरल्या आहेत. सोलापूर शहर मध्य

मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार असलेल्या शिंदे यांनी जुन्या-नव्या सहकाऱ्यांचा मेळ घातला आहे. या मतदारसंघातून उमेदवार देण्यासाठी भाजपकडून रोज नव्या नावाची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारांच्या राज्यातील पहिल्याच यादीच आमदार शिंदे यांचे नाव आल्याने देशाच्या व राज्याच्या राजकारणातील त्यांचे राजकीय वजन स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचा तरुण अन्आक्रमक चेहरा

सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी केवळ सोलापूर शहर मध्य या एकाच मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या विरोधी पक्षाच्या आमदार आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यापासून केंद्र सरकारच्या धोरणावर त्यांनी वारंवार सडकून टीका केली आहे. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (शिंदे गट) या पक्षांच्या नेत्यांवरही त्यांनी आक्रमकपणे हल्लाबोल केला आहे.

विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार शिंदे यांनी मतदारसंघासह राज्यातील विविध प्रश्‍नांवर सातत्याने आक्रमक भूमिका मांडलेली आहे. अधिवेशनात अनेक चर्चांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. अशा तरुण चेहऱ्याला काँग्रेसने संधी दिली आहे. त्यामुळे सोलापूर मतदारसंघातील यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे निश्‍चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.